शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:21 IST

Viral Reddit story: कॅलिफोर्नियातील एका महिलेसोबत एक अविश्वसनीय किस्सा घडला आहे.

कॅलिफोर्नियातील एका महिलेसोबत एक अविश्वसनीय किस्सा घडला. महिलेने जुने सामान विकणाऱ्या दुकानातून बूट खरेदी केले. तिला वाटले की ती केवळ स्वस्त, सेकंड-हँड बूट खरेदी करत आहे, पण या जुन्या बुटांनी तिला थेट £१,२६० (जवळपास ₹१.३ लाख) किमतीची लॉटरी लावली.

या महिलेने एका थ्रिफ्ट स्टोअरमधून म्हणजेच जुने सामान विकणाऱ्या दुकानातून काळ्या लेदर बूटची एक जोडी खरेदी केली. हे बूट खूप चांगल्या दर्जाचे आणि छान दिसत असल्याने महिलेने फक्त $१७.९९  (भारतीय चलनात सुमारे ₹१,३५०) रुपयांत हे बूट खरेदी केले. बूट खरेदी करून घरी आल्यावर, महिलेने बारकाईने पाहिले आणि तिचा विश्वास बसला नाही. तिने लगेच सोशल मिडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर महत्त्वाची माहिती शेअर केली.

महिलेने सांगितले की, तिने हे बूट खरेदी केले कारण ते खूप चांगल्या दर्जाचे होते, नंतर अचानक तिच्या लक्षात आले की, बूटाचे सोल लाल आहे. मग तिला कळले की, ते ख्रिश्चन लुबाउटिन कंपनीचे बूट आहेत. ब्रँडचे नाव कळताच महिलेने त्याबद्दल इंटरनेटवर शोधायला सुरुवात केली, तेव्हा तिला समजले की, हे बूट त्याच 'एन हायवर लग लो' मॉडेलचे होते. ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर हे बूट £१,२६० (भारतीय चलनानुसार ₹१.३ लाखांहून अधिक) किमतीत विकले जात असल्याचे पाहून महिला चकीत झाली. ₹१,३५० मध्ये खरेदी केलेले बूट चक्क शंभर पटीने जास्त किमतीचे लक्झरी डिझायनर बूट ठरले. या महिलेची कहाणी सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.

ख्रिश्चन लुबाउटिन ब्रँडची खासियत

ख्रिश्चन लुबाउटिन हा एक फ्रेंच लक्झरी ब्रँड आहे, जो १९९० च्या दशकापासून फॅशन जगतात स्टाईल आणि उत्कृष्टतेचे प्रतीक मानला जातो. या ब्रँडची ओळख म्हणजे प्रत्येक शूजचा लाल सोल हाताने बनवलेला असतो, त्यामुळे हा बूट इतर ब्रँडपेक्षा वेगळा आणि अत्यंत महागडा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Woman finds luxury Louboutin boots at thrift store, shocked by price!

Web Summary : A woman in California bought used boots for $17.99. Discovering they were Christian Louboutins worth £1,260, she was shocked. The red sole confirmed the luxury brand, turning a cheap find into a valuable score.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्Internationalआंतरराष्ट्रीय