Video: This man save kitten in heavy rain of mumbai people are calling him hero | Video : रिअल हिरो! मुसळधार पावसात अडकलेल्या मनीमाऊचे बाईकस्वारानं वाचवले प्राण

Video : रिअल हिरो! मुसळधार पावसात अडकलेल्या मनीमाऊचे बाईकस्वारानं वाचवले प्राण

कालच्या पावसाने मुंबईसह महाराष्ट्राला चांगलचं झोपडून काढलं. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवांवर परिणाम झाला. तर अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्यानं झाडं कोसळली. रुग्णालयात, लोकांच्या घरात पाणी शिरल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील.  दरम्यान या मुसळधार पावसात अडकलेल्या एका मांजरीचा व्हिडीओ समोर आला आहे. एका बाईकस्वाराने माणूसकी दाखवत पावसात अडकलेल्या छोट्याश्या मनीमाऊला वाचवलं आहे. 

एनएनआयने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.  यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, वडाळा परिसरात एक माणूस मुसळधार पावसात मांजरीचे रेस्क्यू ऑपरेशन करत होता. त्यानंतर हा व्यक्ती मांजरीला घरी घेऊन गेला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १३ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज आणि १ हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता मनीमाऊला बाईकवर ठेवून हा व्यक्ती घरी घेऊन जात आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांना कौतुकाचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी  या व्हिडीयोला खूप पसंती दिली आहे. अनेकांनी या गृहस्थाला हिरो असं म्हटलं आहे. तर काही जणांनी धन्यवाद अशा कमेंट्स केल्या आहेत.

खुशखबर! कोरोनाच्या लसीबाबत 'या' देशातील कंपनीची दिलासादायक माहिती; तज्ज्ञ म्हणाले की...

पावसाळ्यात सुका खोकला आणि कफची समस्या टाळण्यासाठी आधीच वापरा 'हे' सोपे उपाय

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video: This man save kitten in heavy rain of mumbai people are calling him hero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.