Coronavirus : Novavax vaccine shows encouraging results in phase 1 clinical trials us vaccine | खुशखबर! कोरोनाच्या लसीबाबत 'या' देशातील कंपनीची दिलासादायक माहिती; तज्ज्ञ म्हणाले की...

खुशखबर! कोरोनाच्या लसीबाबत 'या' देशातील कंपनीची दिलासादायक माहिती; तज्ज्ञ म्हणाले की...

अलिकडेच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहनॉम गिब्रयेसॉस यांनी कोरोनाच्या माहामारीबाबत धोक्याची सुचना दिली आहे. आतापर्यंत या व्हायरसवर कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध झालेलं नाही. अशा स्थितीत जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणूंची लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोना विषाणूंचा रामबाण उपाय कधीही मिळणार नाही. असं होण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या विधानानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

दरम्यान अमेरिकन कंपनी नोवावॅक्सनेही  दावा केला आहे की, या कंपनीची लस व्हायरसला मारण्यासाठी फायदेशीर ठरेल.  त्यामुळे रोगप्रतिकारकशक्तीही वाढेल. नोवावॅक्स कंपनीच्या कोरोनाच्या लसीचे नाव NVX-CoV2373 आहे. या लसीत कोरोना विषाणूंना नष्ट करण्याची क्षमता आहे. याशिवाय शरीरात एंटीबॉडिज तयार करण्यासाठी ही लस प्रभावी ठरेल. 

प्रतीकात्मक तस्वीर

कंपनीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीचे शेवटच्या टप्प्यातील म्हणजेच तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन केलं जाणार आहे. २०२१ पर्यंत लसीचे १०० ते २०० डोज तयार होणार आहेत. नोवावॅक्सचे प्रमुख ग्लेन यांनी दिलेल्या माहितीनुसार शेवटच्या टप्प्यातील चाचणीच्या आधारावर सरकारकडून लस तयार करण्याची परवानगी दिली जाणार आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी लस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

नोवावॅक्स कंपनी ने आपली लस NVX-CoV237 घेतल्यानंतर कोरोना संक्रमणापासून बचाव होत असल्याचा दावा  केला आहे. ही लस तयार करण्यासाठी अमेरिकेतील व्हाईट हाऊस कडून पैसे पुरवण्यात आले आहेत. या लसीच्या चाचणीस मे महिन्याच्या अखेरीस सुरू झाली आहे. आता शेवटच्या टप्प्यातील चाचणी किती परिणामकारक ठरते याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. 

दरम्यान सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजनी मंगळवारी फ्लूगार्ड ही टॅबलेट लॉन्च केली आहे.  भारतीय बाजारात या टॅबलेटची किंमत ३५ रुपये इतकी आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड१९ ची सौम्य लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांना ही औषधं दिली जाणार आहेत. हे औषध फेविपिराविरचे वर्जन आहे. फेविपरिविर हे एक मात्र असं औषध आहे. ज्या औषधाला भारतात एंटी व्हायरल ट्रिटमेंटसाठी कोविड १९ च्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. फ्लूगार्ड टॅबलेटमध्ये २०० एमजीचा डोस आहे. हे औषध स्वस्त असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचू शकते. 

कोरोनाचं नवीन औषध लॉन्च; सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ५० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार

भारताची पहिली कोरोना लस पाण्याच्या बॉटलपेक्षाही कमी दरात मिळणार? भारत बायोटेकचा मानस

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus : Novavax vaccine shows encouraging results in phase 1 clinical trials us vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.