New coronavirus drug launch in india only 35 rupees price covid medicine fluguard favipiravir | कोरोनाचं नवीन औषध लॉन्च; सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ५० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार

कोरोनाचं नवीन औषध लॉन्च; सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ५० रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होणार

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण जगभरातील लोकांसाठी चिंतेचं कारण ठरलं आहे.  रोज देशात कोरोना संक्रमणाचा सामना हजारो लोकांना करावा लागत आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणावर लोक कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतरही बरे होऊन घरी परतत आहेत. गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. काही महिन्यांपासून डेक्सामेथासोन, फेविपिराविर ही औषध वापरली जात आहेत. आता सन फार्मा कंपनीने कोरोनाची लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांसाठी फ्लूगार्ड नावाचं औषध लॉन्च केले आहे. 

सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजनी मंगळवारी फ्लूगार्ड ही टॅबलेट लॉन्च केली आहे.  भारतीय बाजारात या टॅबलेटची किंमत ३५ रुपये इतकी आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड१९ ची सौम्य लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांना ही औषधं दिली जाणार आहेत. हे औषध फेविपिराविरचे वर्जन आहे. फेविपरिविर हे एक मात्र असं औषध आहे. ज्या औषधाला भारतात एंटी व्हायरल ट्रिटमेंटसाठी कोविड १९ च्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. फ्लूगार्ड टॅबलेटमध्ये २०० एमजीचा डोस आहे. हे औषध स्वस्त असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचू शकते. 

जपानी कंपनी फुजीफिल्म होल्डींग कॉर्प फेविपिराविर हे औषध स्वस्तात तयार करते. ही कंपनी एविगन नावाने हे औषध विकते. इंफ्लुएंजाच्या उपचारांसाठी या औषधांचा वापर केला जातो. मागील अनेक दिवसात कोरोना रुग्णांवर या औषधाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. सन फार्मा कंपनीचे सीईसो  गानोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. अशा स्थितीत कोरोना रुग्णांना तात्काळ उपचारांची आवश्यकता असते. त्यामुळे फ्लूगार्ड लॉन्च केले आहे. हे औषध स्वस्त असल्यामुळे जास्तीत जास्त कोरोना रुग्णांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

लवकरत लवकर बाजारात हे औषध उपलब्ध होणार आहे. याआधीसुद्धा ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीने (Glenmark Pharmaceuticals) कोविड १९ च्या उपचारांसाठी एंटीव्हायरल औषध फेविपिराविर हे बाजारात उतरवलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषध दिलं जातआहे. या औषधांच्या टॅबलेट्च्या एका पाकिटाची किंमत ३ हजार ५०० रुपये इतकी आहे. 

WHO चा दणका! आता चीनची पोलखोल होणार; तज्ज्ञांनी शोधलं कोरोना विषाणूच्या प्रसाराचं मुळ

कोरोनाच्या 'या' औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीस सुरूवात; लवकरच औषध उपलब्ध  होणार 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: New coronavirus drug launch in india only 35 rupees price covid medicine fluguard favipiravir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.