Video: बारावीतील विद्यार्थ्याचे घाणेरडे कृत्ये; शिक्षिकेचे बळजबरी चुंबन, ओठांना चावला; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:43 IST2026-02-05T17:39:57+5:302026-02-05T17:43:33+5:30
Student Bit off Teacher’s Lip Video: एका भयंकर घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. बारावी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने शिक्षिकेवर रस्त्यावर हल्ला केला. इतकेच नाही, तर त्याने रस्त्यात बळजबरी करत ओठांचा चावा घेतला.

Video: बारावीतील विद्यार्थ्याचे घाणेरडे कृत्ये; शिक्षिकेचे बळजबरी चुंबन, ओठांना चावला; व्हिडीओ व्हायरल
Student Attacked on School Teacher: बारावी वर्गामध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेवरच हल्ला केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. रस्त्याने शिक्षिकेसोबत चालत असताना विद्यार्थ्याने हल्ला केला. बळजबरी करत रस्त्यातच शिक्षिकेचे चुंबन घेत ओठांना चावला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून विद्यार्थ्याचा शोध सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये ही घटना घडली आहे. विद्यार्थी बारावी वर्गात शिकत आहे. त्याचे शिक्षिकेवर एकतर्फी प्रेम होते. त्याने यापूर्वी बऱ्याचदा गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. २६ जानेवारी २०२६ रोजी त्याने शिक्षिकेला रस्त्यात गाठून बळजबरी करण्याचा प्रकार घडला.
शिकवणी घेण्यासाठी जात असतानाच...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी शिक्षिका शिकवणी घेण्यासाठी जात होती. त्याचवेळी विद्यार्थी आला. त्याने शिक्षिकेच्या खांद्यावर हात टाकला. तिच्यासोबत जबरदस्ती करण्यास सुरुवात केली.
शिक्षिकेने विरोध करता त्याने शिक्षिकेला पकडले आणि भररस्त्यातच बळजबरी चुंबन घेतले. शिक्षिका विरोध करत असत तो तिच्या ओठांना जोरात चावला, ज्यामुळे शिक्षिकेचा ओठ चिरला गेला.
विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत घाणेरडे कृत्य, व्हायरल व्हिडीओ
In UP’s Mainpuri district, a class 12 student attacked and forced himself on his female school teacher on the road. The accused bit off teacher’s lip. Critically injured survivor has landed in hospital. pic.twitter.com/UIrWPaRV9o
— Piyush Rai (@Benarasiyaa) February 5, 2026
शिक्षिकेच्या बहिणीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मैनपुरी पोलीस ठाण्यात विद्यार्थ्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्याच्या आईवडिलांनीही पोलिसांना तक्रार दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
UP's Mainpuri police claims the class 12 boy is a repeat offender and had harassed the victim female teacher in past. Complaints were raised with boy's parents too. The incident took place when the female teacher was on her way to a tution class. https://t.co/TthtmXRqpGpic.twitter.com/romLMRf0ha
— Piyush Rai (@Benarasiyaa) February 5, 2026
पोलिसांनी सांगितले की, यापूर्वी विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत केलेल्या कृत्याची माहिती घेत आहोत. त्यादिवशी घडलेल्या घटनेचा व्हिडीओही पोलिसांना मिळाला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थी फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलीस पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्याला लवकरच अटक करू असे पोलिसांनी सांगितले.