आरारारारा खतरनाक! २ वर्षाच्या मुलाने खतरनाक सापासोबत केलं असं काही, बघणारे बघतच राहिले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 13:54 IST2021-10-06T13:50:43+5:302021-10-06T13:54:23+5:30
मुलाच्या वडिलाने स्वत; हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत हा चिमुकला इतक्या मोठ्या सापासोबत खेळताना दिसत आहे.

आरारारारा खतरनाक! २ वर्षाच्या मुलाने खतरनाक सापासोबत केलं असं काही, बघणारे बघतच राहिले...
साप (Snake) बघितल्यावर भल्याभल्या लोकांना घाम फुटतो. पण ऑस्ट्रेलियात (Australia) दोन वर्षाच्या एका मुलाने सापासोबत (Kids play with snake) असं काही केलं की बघून सगळे हैराण झाले. हा मुलगा साधारण २ मीटर लांब सापाला हाताने खेचतो आणि फेकतो. त्याच्यासाठी हा एखादा खेळ असल्यासारखाच तो वागतो.
मुलाच्या वडिलाने स्वत; हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत हा चिमुकला इतक्या मोठ्या सापासोबत खेळताना दिसत आहे. आता लोकांना प्रश्न पडला आहे की, हा मुलगा कोण आहे? चला तर मग जाणून घेऊ....
डेली मेलनुसार, हा मुलगा ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मॅट राइट यांचा मुलगा आहे. मॅट जंगली प्राण्यांना रेस्क्यू करण्यासाठी ओखळले जातात. खासकरून मगर. गेल्या २० वर्षात ते उत्तर भागात मगरींना पकडून त्यांना स्थानांतरित करत आहेत. मॅट राइटने नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे.
या व्हिडीओत त्यांच्या गार्डनमध्ये एका लांबलचक साप दिसत आहे. साप फारच खतरनाक आणि मोठा आहे. या सापाला मॅट राइट यांच्या मुलाने पकडून ठेवलं आहे. पूर्ण आत्मविश्वासाने मुलगगा सापाची शेपटी पकडून त्याला खेचण्याचा प्रयत्न करत आहे.