VIDEO: जिममध्ये वजन उचलताना अचानक तोल गेला, मुलीच्या मानेवर पडला वजनदार बार अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:22 IST2025-11-20T12:21:23+5:302025-11-20T12:22:06+5:30
Gym Accident Viral Video : एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

VIDEO: जिममध्ये वजन उचलताना अचानक तोल गेला, मुलीच्या मानेवर पडला वजनदार बार अन् मग...
Gym Accident Viral Video : सोशल मीडियावर तुम्ही जिममधील अनेक व्हिडीओ पाहिले असतील. मध्यंतरीच्या काळात जिममध्ये झालेल्या अपघाताचेही व्हिडीओ व्हायरल झाले होते. जिममध्ये ट्रेनर्सच्या देखरेखीखाली वर्कआऊट करण्याचे सल्लेही दिले जातात. असे असूनही, अद्याप जिममधील अपघातांचे प्रमाण म्हणावे तितके कमी झालेले नाही. अलिकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.
समतोल बिघडला अन् घडू नये ते घडले...
व्हिडिओच्या सुरुवातीला जिममध्ये अनेक लोक विविध व्यायाम करताना दिसतात. त्यानंतर एक तरुणी जड वजनाचे बारबेल (बार) उचलण्याचा प्रयत्न करते. ती वजन उचलत असताना तिच्या आसपास मदतीला कुणीच नसते. तशातच तिचा तोल जातो आणि वजनाचा बार तिच्या मानेवर पडतो. तिच्या मानेवरचा दणका इतका जोरदार असतो की, की जागच्या जागी बेशुद्ध पडते. त्यााक्षणी मुलगी जमिनीवर कोसळते आणि पडल्यानंतर तिच्या शरीराची कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. पाहा व्हिडीओ-
— Wild CCTV (@wildcctv) November 17, 2025
घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मुलगी जमिनीवर कोसळल्यानंतर आसपासचे लोक तिला उचलण्यासाठी धावतात. ते तिला उठवण्याचा प्रयत्न करतात. पण मुलगी बेशुद्ध पडल्याचे दिसते. त्यापुढे काय घडते याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. हा व्हिडीओ wildcctv नावाच्या अकाऊंटवरून एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टवर लोक विविध कमेंट करताना दिसत आहेत.