VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:02 IST2025-10-24T16:01:08+5:302025-10-24T16:02:01+5:30
Desi Aunty Funny Dance Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होताना काहीलोक स्वत:चच हसं करून घेतात.

VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
Desi Aunty Funny Dance Viral Video: सोशल मीडियावर कधीही काहीही व्हायरल होऊ शकते. कधी एखादा चांगला व्हिडीओ व्हायरल होतो तर कधी एका विचित्र व्हिडीओ चर्चेत येतो. लोकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून अनेक कलाकार सोशल मीडियाचा प्रभावी वापर करतात. पण काही लोक मात्र सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी विचित्र प्रयत्न करतात आणि स्वत:चच हसं करून घेतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ अतिशय मजेशीर असून तुम्हीही तुमचे हसू रोखू शकणार नाही.
व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक मुलगा त्या महिलेच्या डान्स व्हिडीओबद्दल सांगतो. त्यानंतर तो व्हिडीओ प्ले होतो. या व्हिडीओमध्ये डान्स करणारी महिला अतिशय विचित्र प्रकारच्या स्टेप्स करत नाचताना दिसते. प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल याच्या 'बॅड न्यूज' चित्रपटातील "हुस्न तेरा तौबा तौबा' या सुपरहिट गाण्यावर ही महिला अतिशय बेधुंदपणे नाचते. तिच्या मागे या महिलेचा मुलगा काहीही न बोलता थंब्स अप करून उभा राहतो. या व्हिडीओमुळे सारेच हसून लोटपोट होताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडिओ official_sanju08 या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये नंतर एक मुलगा व्हिडीओखालील मजेशीर कमेंट्सदेखील वाचून दाखवतो आहे. सर्वच जण या महिलेचा विचित्र अशा डान्स स्टेप्स पाहून तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. तिच्या विचित्र डान्समुळेच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.