उत्तर प्रदेशातील आग्रा येथून पर्यटकांच्या गैरवर्तणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे काही पर्यटकांनी अवघ्या ५०० रुपयांत बुक केलेल्या होमस्टेमध्ये मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत या पर्यटकांवर टीका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पर्यटकांनी आग्र्यातील एक होमस्टे केवळ ५०० रुपयांना भाड्याने घेतलं होतं. मात्र, त्या बदल्यात त्यांनी त्या ठिकाणच्या मालमत्तेचं मोठं नुकसान केलं. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, काही तरुण शूज घालून बेडवर जोरात उड्या मारत आहेत, बेडवर नाचले, ज्यामुळे बेडचं नुकसान झालं आहे. इतकंच नाही तर त्यांनी रूममधील बल्ब आणि इतर काही सामान चोरून नेल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
होमस्टे मालकाने शेअर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे पर्यटक खोलीत गोंधळ घालताना दिसत आहेत. त्यांनी खोलीची दुरवस्था केली आणि फर्निचरची देखील तोडफोड केली, ब्लँकेटचीही वाट लावली. होमस्टेच्या मालकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. 'इतक्या कमी किमतीत सुविधा देऊनही लोक असे वागतात, हे दुर्दैवी आहे' अशा भावना मालकाने व्यक्त केल्या आहेत.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी पर्यटकांच्या या कृत्याचा निषेध केला आहे. अनेकांनी "अशा पर्यटकांना ब्लॅकलिस्ट करावं" आणि "त्यांच्याकडून झालेल्या नुकसानीची भरपाई घ्यावी" अशी मागणी केली आहे. पर्यटनाच्या नावाखाली लोकांच्या खासगी मालमत्तेची नासधूस करणाऱ्या या प्रवृत्तीमुळे होमस्टे मालकांमध्ये भीती आणि नाराजीचं वातावरण आहे.
Web Summary : Tourists in Agra vandalized a home stay they rented for ₹500. They jumped on beds with shoes, damaged furniture, stole items, and caused significant property damage. The home stay owner expressed outrage, and social media users condemned the behavior.
Web Summary : आगरा में पर्यटकों ने ₹500 में किराए पर लिए गए एक होम स्टे में तोड़फोड़ की। उन्होंने जूतों के साथ बिस्तर पर कूदकर, फर्नीचर को नुकसान पहुंचाया, सामान चुराया और संपत्ति को काफी नुकसान पहुंचाया। होम स्टे के मालिक ने आक्रोश व्यक्त किया, और सोशल मीडिया उपयोगकर्ताओं ने व्यवहार की निंदा की।