सोशल मीडियावर सात्याने नवनव्या व्हिडिओजचा भडीमार सुरू असतो. सातत्याने नवनवे व्हिडिओ व्हयरल होत असतात. अनेक वेळा तर, लोक काही तरी नवे करण्याच्या नादात अथवा कुणाची तरी खिल्ली उडवण्याच्या नादात स्वतःचेच हसे करून घेताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यात एका पाकिस्तानी ब्लॉगरने स्वतःचीच 'इंटरनॅशनल बेइज्जती' करून घेतल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानी ब्लॉगरचा प्रश्न आणि रशियण मुलीचं भन्नाट उत्तर -सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @AyushBandhe नावाच्या एका अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, एक पाकिस्तानी ब्लॉगर रशियाच्या रस्त्यांवर काही रशियन तरुणींना एक प्रश्न विचारतो. तो त्यांना विचारतो की, "तुम्हाला लग्नासाठी अथवा रिलेशनशिपसाठी मुलाची निवड करायची असेल, तर तुम्ही कोणत्या देशाच्या मुलाची निवड कराला? भारत, पाकिस्तान की बांगलादेश?" हा प्रश्न ऐकून त्या तरुणी क्षणाचाही विलंब न करता, "भारतीय मुलाची (Indian Boys)" असे उत्तर देतात. हे उत्तर ऐकताच पाकिस्तानी ब्लॉगरचा चेहरा बघण्यासारखा होतो.
सोशल मीडियावर युजर उडवतायेत खिल्ली - पाकिस्तानी ब्लॉगरने विचारलेल्या या प्रश्नाचा व्हडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. युजर्सनी त्याची जबरदस्त खिल्ली उडवत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये म्हटले आहे, "पाकिस्तानी ब्लॉगरची गजब बेइज्जती झाली." आणखी एकाने लिहिले, "बिचाऱ्याची इंटरनॅशनल बेइज्जती झाली." एकाने लिहिले, "रशियन मुलींनाही माहिती आहे, पाकिस्तान आणि बांगलादेशकडे स्वतःच्या खाण्यासाठीच पीठ नाही."
Web Summary : A Pakistani blogger's video asking Russian girls about their preferred nationality for marriage went viral. The girls chose Indian men, leading to online mockery of the blogger.
Web Summary : पाकिस्तानी ब्लॉगर का रूसी लड़कियों से शादी के लिए पसंदीदा राष्ट्रीयता पूछने वाला वीडियो वायरल हो गया। लड़कियों ने भारतीय पुरुषों को चुना, जिससे ब्लॉगर का ऑनलाइन उपहास हुआ।