सफाईदारपणे सायकलची चोरी केली पण अडकला आपल्याच जाळ्यात, मालकाने असे काही केले की
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 15:17 IST2021-11-23T15:14:10+5:302021-11-23T15:17:13+5:30
एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. चोर चोरी करायला गेला खरा पण त्यानंतर जे घडले ते पाहुन तुम्हीच म्हणाल चांगली अद्दल घडली याला.

सफाईदारपणे सायकलची चोरी केली पण अडकला आपल्याच जाळ्यात, मालकाने असे काही केले की
दररोज हजारो लाखांचे दरोडे आणि चोरीच्या घटना घडतात. पण काही चोरटे असे प्रकार करतात. जे पाहून तुम्हीही तुमचे हसणे कंट्रोल करु शकणार नाही. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. चोर चोरी करायला गेला खरा पण त्यानंतर जे घडले ते पाहुन तुम्हीच म्हणाल चांगली अद्दल घडली याला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घराच्या मालकाने त्याचे गेट बंद केले नाही. दरम्यान, संधीचा फायदा घेत चोरट्याने आत प्रवेश केला. यानंतर चोर घरामध्ये इकडे तिकडे पाहतो. तेव्हा चोराची नजर समोर उभ्या असलेल्या स्कूटी आणि सायकलवर पडते. यानंतर चोर सायकल घेऊन घाईघाईने दरवाजातून बाहेर पडतो.
मात्र, घरमालक चोरट्याला चोरी करताना पाहतो. त्याची सायकल परत घेण्यासाठी तो त्याच्या मागे धावतो. काही वेळाने मालक आपली सायकल घरी परत आणताना दिसतो. चोर आणि मालकाची ही धावपळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
लोकांना हा व्हिडीओ एवढा आवडला आहे की तो पुन्हा पुन्हा बघून हसत आहेत. हा व्हिडिओ memes.bks नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहिपर्यंत हा व्हिडिओ ४० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे.