गाणं सुरु होताच शिक्षकाने धरला ठेका, विद्यार्थ्यांसह सर्वजण झाले अवाक्, हॉलीवुडलाही पडली भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 03:31 PM2021-12-08T15:31:22+5:302021-12-08T15:31:33+5:30

एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसतात. हा व्हिडिओ अमेरिकेच्या फ्रेस्नो शहरातील टेनाया मिडल स्कूल येथील आहे.

teacher dancing on song video goes viral on social media | गाणं सुरु होताच शिक्षकाने धरला ठेका, विद्यार्थ्यांसह सर्वजण झाले अवाक्, हॉलीवुडलाही पडली भुरळ

गाणं सुरु होताच शिक्षकाने धरला ठेका, विद्यार्थ्यांसह सर्वजण झाले अवाक्, हॉलीवुडलाही पडली भुरळ

Next

आपलं टॅलेंट जगाला दाखवायला वयाची काही सीमा नसते यामुळेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अनेक लोकांचं निरनिराळं टॅलेंट (Talent) पाहायला मिळतं. अगदी २ वर्षाच्या लहान मुलापासून वृद्ध व्यक्तींपर्यंत अनेकांचे निरनिराळे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसतात. हा व्हिडिओ अमेरिकेच्या फ्रेस्नो शहरातील टेनाया मिडल स्कूल येथील आहे.

या व्हिडिओने सामान्य लोकांसोबत हॉलिवूड स्टारचंही लक्ष वेधलं आहे. इतकंच नाही तर व्हिडिओला करोडो व्ह्यूजही मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार डान्स करणाऱ्या या शिक्षकाचं नाव ऑस्टिन लेमे असं आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितलं, की मी अनेक तास आरशासमोर असंच नाचत राहतो. सोबतच अंघोळ करतानाही गाणं गात नाचण्याचा आनंद घेतो. मला आनंद आहे, की माझा हा डान्स लोकांच्या पसंतीस उतरत आहे. एका साप्ताहिक रॅलीमध्ये जेव्हा मला गाण्याचा आवाज आला तेव्हा डान्स करण्याची इच्छा झाली. यानंतर मी स्वतःला रोखू शकलो नाही. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की आपल्या शिक्षकाला डान्स करताना पाहून तिथे उपस्थित विद्यार्थीही थिरकू लागतात.

या शिक्षकाने सांगितलं की, मला माहिती होतं की प्रसिद्ध टिकटॉकर मिस जेनी मॅकाउली माझा व्हिडिओ बनवत आहे. जेव्हा मी रविवारी सकाळी टिकटॉक पाहिलं तेव्हा समजलं की हा डान्स व्हिडिओ ५० लाखहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. पाहता-पाहता काहीच वेळात ही संख्या एक कोटी आणि नंतर दोन कोटी झाली. इतकंच नाही तर या व्हिडिओने आयरलँड बाल्डविन, क्रिस ब्राउन आणि स्नूप डॉगसारख्या प्रसिद्ध व्यक्तींचंही लक्ष वेधलं असल्याचं शिक्षकाने सांगितलं.

हा व्हिडिओ आता सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे. सोबतच लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडिओ जॅनी मॅकाउलीने आपल्या टिकटॉक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअऱ करत त्यांनी लिहिलं, ज्या दिवशी लेमेनं हा डान्स केला, तो आमच्यासाठी एक शुक्रवार होता. मात्र जेव्हा मी हा व्हिडिओ टिकटॉकवर टाकला तेव्हा याला इतकी पसंती मिळेल याची मला कल्पनाही नव्हती. करोडो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून लाखो लोकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Web Title: teacher dancing on song video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app