समुद्रात शांतपणे पोहत होता अचानक सर्वबाजूंनी आले शार्क, त्याच्यावर हल्ला करणार इतक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 11:49 AM2021-10-11T11:49:44+5:302021-10-11T11:49:53+5:30

नुकतंच अमेरिकेच्या एका सर्फरला (Surfer) शार्कनं चारही बाजूंनी घेरलं, मात्र त्यानंतर जे झाले ते पाहुन तुम्हीही हैराण व्हाल....

surfer surrounded by sharks in sea shocking video goes viral | समुद्रात शांतपणे पोहत होता अचानक सर्वबाजूंनी आले शार्क, त्याच्यावर हल्ला करणार इतक्यात...

समुद्रात शांतपणे पोहत होता अचानक सर्वबाजूंनी आले शार्क, त्याच्यावर हल्ला करणार इतक्यात...

Next

अनेक देशांतून शार्कच्या हल्ल्याच्या (Shark Attack) बातम्या समोर येत राहतात. या घटनांमध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागतात तर अनेकजण गंभीररित्या जखमी होतात. नुकतंच अमेरिकेच्या एका सर्फरलाही (Surfer) शार्कनं चारही बाजूंनी घेरलं, मात्र त्यानंतर जे झाले ते पाहुन तुम्हीही हैराण व्हाल....

अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणारा एली मॅक्डोनल्ड्स आणि त्याची होणारी पत्नी लॉरा ईवान्स सर्फिंगचा आनंद घेण्यासाठी लेने ब्रेवर्ड काउंटीच्या बीचवर गेले होते. समुद्रात उंच लाटा दिसताच एलीला सर्फिंग करण्याची इच्छा झाली. एली समुद्रात होता तर लॉरा बीचवरुन त्याचा व्हिडिओ काढत होती.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एलीला आपल्या आसपास काही लहान मासे दिसले. तो हे मासे निरखून पाहण्याचा प्रयत्न करत होता, इतक्यात त्याची नजर शेजारीच फिरत असलेल्या शार्कवर पडली. हे पाहून एलीला धक्का बसला. त्यानं आसपास पाहिलं तर शेजारी आणखीही काही शार्क त्याच्या चारही बाजूंनी फिरत होते

लॉरानं म्हटलं, मी एलीच्या जवळ शार्क पाहताच घाबरले आणि माझ्या मनात विचार आला की जोरात ओरडून त्याच्याजवळ जावं आणि त्याचा जीव वाचवावा. मात्र, मी स्वतःला शांत केलं आणि असा विचार केला की या स्थितीत काय करायचं, हे एलीला माहिती आहे. मला हेदेखील माहिती होतं, की अशी परिस्थिती एलीसाठी अगदीच खास असेल, त्यामुळे मी त्याचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यास सुरुवात केली. एली लगेचच पोहत समुद्रातून बाहेर आला आणि त्याचा जीव वाचलाएलीच्या या व्हिडिओवर अनेक लोक प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.

Web Title: surfer surrounded by sharks in sea shocking video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.