कानात कोळ्याने केले घर; पाहून डॉक्टरही चक्रावून गेले, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 15:09 IST2023-07-19T15:08:14+5:302023-07-19T15:09:12+5:30
Spider In Ear: हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

कानात कोळ्याने केले घर; पाहून डॉक्टरही चक्रावून गेले, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ...
Spider Found In Man's Ear: आपल्या कानात एखादा किडा शिरला किंवा पाण्याचा थेंबही पडला तरी आपण बेचैन होतोत. मग विचार करा की, एखाद्या माणसाच्या कानात कोळ्याने(Spider) घर केले तर..? नुसता विचार करुनही अंगावर काटा येईल, पण चीनमधील एका व्यक्तीसोबत ही घटना घडली आहे. रुग्णाच्या कानात चक्क कोळी रेंगाळताना पाहून डॉक्टरही चक्रावून गेले.
कोळ्याने कानात घर केले...
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डेली मेल (@Daily Mail) ने Instagram वर शेअर केलेल्या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये सांगितले की, चीनमधील एक व्यक्ती कानात दुखत असल्याने डॉक्टरांना दाखवायला गेला. डॉक्टरांनी कानाची तपासणी केल्यावर कानात चक्क कोळ्याने जाळे तयार केल्याचे आढळून आले. व्हायरल क्लिपमध्ये, माणसाच्या कानात बसलेला जिवंत कोळी स्पष्टपणे दिसत आहे.
पहा व्हायरल व्हिडिओ-
या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. युजर्स व्हिडिओवर विविध कमेंट्स करून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. एकाने लिहिले - हे खूप भयानक आहे. आणखी एकाने म्हटले की- हे पाहिल्यानंतर शांत झोप लागणार नाही. तिसऱ्याने सांगितले की, कानात कोळी किंवा किडा गेल्यावर शांत राहा आणि तात्काळ डॉक्टरांकडे जा.