वजन कमी करा, पैसे मिळवा! कंपनी देतेय जबरदस्त ऑफर; कर्मचाऱ्यांना वजन कमी केल्यावर लाखो डॉलर्स मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 12:17 IST2025-09-08T12:16:36+5:302025-09-08T12:17:38+5:30

चीनच्या एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक भन्नाट ऑफर दिली आहे. कर्मचाऱ्यांना फक्त वजन कमी करायचे आहे.

social viral Lose weight, earn money! Company is giving a great offer; Employees will get millions of dollars if they lose weight | वजन कमी करा, पैसे मिळवा! कंपनी देतेय जबरदस्त ऑफर; कर्मचाऱ्यांना वजन कमी केल्यावर लाखो डॉलर्स मिळणार

वजन कमी करा, पैसे मिळवा! कंपनी देतेय जबरदस्त ऑफर; कर्मचाऱ्यांना वजन कमी केल्यावर लाखो डॉलर्स मिळणार

वाढलेले वजन कमी करणे हे आपल्या समोरील सर्वात मोठे चॅलेंज असते. आपण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो, खाण्यात बदल, दररोज व्यायाम करतो. डाएट प्लान घेतो. यासाठी आपले पैसेही खर्च होतात. पण, आता चीनमधील एक कंपनी वजन कमी करणाऱ्या कर्मचाऱ्यालाच पैसे देणार आहे. चीनमध्ये एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना वजन कमी करण्यासाठी एक भन्नाट ऑफर दिली. वजन कमी करणाऱ्या कर्मचाऱ्याला ही कंपनी २,८०० डॉलर म्हणजेच २.५ लाख रुपये देणार आहे. या ऑफरमुळे कंपनीची जोरदार चर्चा सुरू आहे. 

शेन्झेन-आधारित टेक फर्म अराशी व्हिजन इंक. त्यांच्या वार्षिक 'मिलियन युआन वेट लॉस चॅलेंज'साठी हे वजन तयार केले आहे. कंपनीने आतापर्यंत त्यांच्या कर्मचाऱ्यांना २० लाख युआन म्हणजेच सुमारे २.४ कोटी रुपये बोनस म्हणून दिले आहेत.

भाजपा खासदाराच्या बहि‍णीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?

वजन किती कमी करावे लागणार?

सर्व कर्मचारी या आव्हानासाठी नोंदणी करण्यास पात्र आहेत. प्रत्येक ५०० ग्रॅम वजन कमी केल्याबद्दल, सहभागींना ५०० युआन रोख बक्षीस दिले जाते. मनोरंजक म्हणजे, या आव्हानात दंडाच्या रक्कमेचाही समावेश आहे. पुन्हा वजन वाढवणाऱ्या सहभागींना प्रत्येक अर्धा किलो वजन वाढवल्याबद्दल ८०० युआन म्हणजेच ९,३३७ रुपये दंड भरावा लागणार आहे.

याला ३६० म्हणूनही ओळखले जाते. १२ ऑगस्ट रोजी, ही टेक कंपनी त्यांच्या वार्षिक मिलियन युआन वजन कमी करण्याच्या आव्हानामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. दरवर्षी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दररोज व्यायाम करून आणि संतुलित आहार घेऊन निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित करणे आहे.

काही कर्मचाऱ्यांनी वजन कमी केले

पुरस्कार विजेत्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आम्ही शिस्त पाळली आणि काही नियमित व्यायाम केले, यामुळे आमचे वजन कमी झाले.आम्हाला वाटते की हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ आहे. हे केवळ सौंदर्याबद्दलच नाही तर आरोग्याबद्दल देखील असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Web Title: social viral Lose weight, earn money! Company is giving a great offer; Employees will get millions of dollars if they lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.