Social Viral: आजी भिडली Google Gemini ला! गप्पांच्या ओघात विचारला असा प्रश्न की AI पण चक्रावलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:25 IST2026-01-07T12:23:36+5:302026-01-07T12:25:53+5:30
Social Viral: डिजिटल युगातील आजीबाई आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ही जुगलबंदी खरोखरच कौतुकास्पद आहे, तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात का?

Social Viral: आजी भिडली Google Gemini ला! गप्पांच्या ओघात विचारला असा प्रश्न की AI पण चक्रावलं!
सोशल मीडियाच्या जगात रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण सध्या एका आजीबाईंच्या व्हिडिओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. तंत्रज्ञान आणि माणुसकीची एक अतिशय गोड 'जुगलबंदी' या व्हिडिओत पाहायला मिळतेय. आपल्या नातीच्या मोबाईलमधील Google Gemini (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) सोबत आजीने Google Gemini ला नात समजून तिच्याशी गप्पा मारल्या.
"काय करते?"
व्हिडिओमध्ये दिसतंय की, आजी अगदी सहजपणे जेमिनीशी संवाद साधत आहेत.आपल्या नातीशी बोलावे तसे आजीने जेमिनीला बोलते केले, "काय करते?" जेमिनीनेही तितक्याच तत्परतेने उत्तर दिले. त्यानंतर आजीने आपला जिव्हाळ्याचा प्रश्न मांडला— "गुडघे दुखीवर काही उपाय आहे का?" जेमिनीने नम्रपणे नकार देत वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला.
"आज माझा वाढदिवस आहे!"
गप्पांचा ओघ पुढे सरकला आणि आजीने आनंदाने सांगितले, "आज माझा वाढदिवस आहे!" त्यावर जेमिनीने अतिशय प्रेमाने आजीला शुभेच्छा दिल्या. आजीने पुढे आपले दिवसभराचे वेळापत्रकही सांगितले, "देवाची पूजा केली, छान स्वयंपाक केला." एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने आपल्या घरातील माणसाला सांगावे, तसे आजी या यंत्राशी संवाद साधत होत्या.
धमाल ट्विस्ट:
गप्पांच्या शेवटी आजीने असा एक प्रश्न विचारला की, ऐकणाऱ्यांना हसू आवरलं नाही. आजी विचारतात, "तुझं लग्न झालंय का?"
यावर गुगल जेमिनीने अत्यंत तांत्रिक पण मजेशीर उत्तर दिले. जेमिनी म्हणाली, "मी एक यंत्र (AI) आहे, मला मानवासारखा संसार, कुटुंब किंवा नातेसंबंध यांची गरज नाही." आजीने हे उत्तर ऐकून जे काही आश्चर्य व्यक्त केलं, ते पाहून नेटकरी म्हणत आहेत, "आजीला वाटलं असेल पोरीला एखादं चांगलं स्थळ सुचवावं!", ''आजी बहुतेक नातसुनेच्या शोधात आहेत'', ''बघ नाहीतर आजी लग्नासाठी मुलगा शोधायच्या!''
आधुनिक तंत्रज्ञान आणि आजीची माया
हा व्हिडिओ केवळ मनोरंजक नाही, तर तो बदलत्या काळाचे प्रतीक आहे. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी आजीबाईंची चौकस वृत्ती आणि त्यांची माया आजही तशीच आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपल्या आजीची आठवण आली.
सोबत दिलेली आजींची व्हिडीओ लिंक पाहा-