बाबो! तरूणाचा फणा काढलेल्या सापाला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 13:02 IST2021-10-30T12:59:31+5:302021-10-30T13:02:23+5:30
Snake Viral Video : काही लोकांना प्राण्यांसोबत खेळणं, मस्ती करण आवडतं. काही लोक प्राण्यांबाबत इतकेच क्रेझी असतात की, ते त्यांना नेहमी आपल्या सोबत ठेवतात.

बाबो! तरूणाचा फणा काढलेल्या सापाला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल...
या जगात असे अनेक लोक असतात ज्यांना खतरनाक कामे करण्यात मजा येते. अनेकदा डेरिंगच्या नादात लोक आपला जीव धोक्यात टाकतात. काही लोकांना यात यश मिळतं तर काही लोकांसोबत हे करत असताना दुर्घटना होते. पण आता जो एक व्हिडीओ व्हायरल (Social Viral Video) झाला आहे तो बघून कुणीही हेच म्हणेल 'काय डेरिंग आहे'. काही लोक हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत तर काही लोक मजा घेत आहेत.
काही लोकांना प्राण्यांसोबत खेळणं, मस्ती करण आवडतं. काही लोक प्राण्यांबाबत इतकेच क्रेझी असतात की, ते त्यांना नेहमी आपल्या सोबत ठेवतात. सापाचं नाव काढताच भल्याभल्यांना घाम फुटतो. अशात फणा काढलेल्या सापाला किस करणं म्हणजे दूरच. पण असा कारनामा एका तरूणाने केलाय. त्याचा एक खतरनाक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या तरूणाने सापाला असं काही किस केलं की, बघून भीती वाटते. पण काही लोकांना हे भारी डेरींग वाटतंय. आश्चर्याची बाब म्हणजे फणा काढलेल्या सापाने किस करत असताना जराही हालचाल केली नाही. पण हा प्रकार पाहून अनेकांना भीती नक्कीच वाटली. हा व्हिडीओ 'goga_ni_daya' या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलाय. तर ३३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला लाइक केलंय.