कमाल! छोट्याशा गावातील तरुणाची ३४ व्या वर्षी ४ कोटींची बचत; सांगितला पैसे कमवण्याचा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:37 IST2025-07-08T13:35:19+5:302025-07-08T13:37:26+5:30
३४ वर्षीय टेक्नॉलॉजी एक्सपर्टने १० वर्षांत तब्बल ४ कोटींची बचत केली आहे.

कमाल! छोट्याशा गावातील तरुणाची ३४ व्या वर्षी ४ कोटींची बचत; सांगितला पैसे कमवण्याचा प्लॅन
छोट्याशा गावात शिकलेल्या एका भारतीय तरुणाने सोशल मीडियावर त्याची गोष्ट शेअर केली आहे, ज्यामुळे लाखो लोकांना आता प्रेरणा मिळाली आहे. विशेष म्हणजे ३४ वर्षीय टेक्नॉलॉजी एक्सपर्टने १० वर्षांत तब्बल ४ कोटींची बचत केली आहे. यासाठी तो कोणतीही लॉटरी खेळला नाही किंवा वडिलोपार्जित संपत्तीही नाही, त्याने फक्त कठोर परिश्रम, शिस्त आणि साधं जीवन जगून इतके पैसे कमावले आहेत.
रेडिटच्या 'आर/नोएडा' ग्रुपवर त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली. त्याने लिहिलं की, "आज मी ३४ वर्षांचा आहे आणि माझी बचत ४ कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. वारसा नाही, लॉटरी नाही, फक्त १० वर्षांची मेहनत, संयम आणि शिस्त." टेक्नॉलॉजी एक्सपर्टने सांगितलं की, त्याचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. वडील रोजंदारीवर काम करायचे, त्यामुळे घर चालवणं अवघड होतं. सरकारी हिंदी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलं आहे.
वडील नेहमी म्हणायचे - "ज्या दिवशी लोक मला तुझ्यामुळे ओळखतील, तेव्हा मला अभिमान वाटेल." ही गोष्ट आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा बनली. जेव्हा पहिल्यांदा कॉम्पूटर पाहिला तेव्हा ते पॅशन बनलं. जेव्हा त्याला कॉम्पूटर मिळाला आणि आवड कळली तेव्हा आयुष्य बदललं. कोणत्याही मेंटर किंवा कोचिंगशिवाय, ऑनलाईन फ्री रिसोर्सेसमधून शिकण्यास सुरुवात केली, पुस्तकं वाचली आणि स्वतःच्या चुकांमधून शिकलो.
फुल-टाईम जॉब मिळाला आणि त्याच वेळी पार्ट टाईम बिझनेस सुरू केला. दरमहा बचत करत केली, खर्च नियंत्रणात ठेवला. गाड्या हव्या होत्या, पण घर खरेदी करण्याची घाई नव्हती. आज माझ्याकडे एक कार आणि एक बाईक आहे. मी घर खरेदी केलेलं नाही, कारण माझ्या वडिलांना माझ्या मेहनतीचा सर्वात जास्त अभिमान असेल, फक्त संपत्तीचा नाही असं टेक्नॉलॉजी एक्सपर्टने म्हटलं आहे. सोशल मीडियावर लोक त्याला "रियल हिरो" म्हणत आहेत. या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत.