शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अधिकाऱ्यांची भीती खरी ठरली! स्लीपर वंदे भारत खराब केली, प्रवाशांनी सीटवर टाकला कचरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:03 IST

Sleeper Vande Bharat Train News: रेल्वेमध्ये स्वच्छता ठेवणे हे प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Sleeper Vande Bharat Train News: भारतीय रेल्वेने स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करून आणखी एक मोठा पल्ला गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात आले. स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होण्यापूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली भीती खरी होताना पाहायला मिळाली. स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होताच प्रवाशांनी खराब केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या लोकार्पणाआधी एक्सवर एक पोस्ट केली होती. “कृपया जर तुम्ही ‘टॉयलेट मॅनर्स’ शिकलेले असाल, तसेच वॉशरूमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणार असाल, आणि तुम्हाला सार्वजनिक मालमत्तेबाबत आदर असेल तरच या ट्रेनने प्रवास करा. धन्यवाद!” अशी पोस्ट केली होती. यानंतर स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण झाल्यानंतर प्रवाशांनी बसल्या जागीच कचरा टाकल्याचे पाहायला मिळाले.

‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ सुरू होताच अस्वच्छ

भारतीय रेल्वेच्या कोणत्याही ट्रेनमध्ये अस्वच्छता, कचरा, पान खाऊन थुंकल्याच्या पिचकाऱ्या सामान्य गोष्ट आहे. मग ती राजधानी असो, शताब्दी असो, कोणतीही मेल, एक्सप्रेस या रेल्वे ट्रेनमध्ये बर्थपासून ते शौचालयांपर्यंत, सर्वत्र घाण, अस्वच्छता आढळणे ही एक सामान्य गोष्ट झालेली आहे. ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ही याला अपवाद ठरली नाही.  रेल्वेने कितीही स्वच्छता, टापटीपपणा, नेटकेपणा ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी प्रवाशांच्या सवयी स्वच्छतेच्या आड येताना दिसतात. स्लीपर वंदे भारतमध्येही हाच अनुभव आल्याचे पाहायला मिळाला.

सोशल मीडियावर प्रचंड रोष

स्लीपर वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना काही प्रवाशांनी प्रवास करताना वापरलेले चहाचे कप, कागद आणि रॅपर्स कचऱ्याच्या डब्यात न टाकता रेल्वेच्या कोचमध्ये बसल्या जागी टाकल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामुळे त्या प्रवाशांच्या वागण्यावर सोशल मीडियावर प्रचंड रोष व्यक्त होत आहे. ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ ही एक भारतीय रेल्वेची अत्याधुनिक रेल्वे मानली जाते. या ट्रेनमध्ये रेल्वे प्रशानसाकडून स्वच्छतेची चांगली काळजी घेतली जाते. ट्रेनमध्ये ठिकठिकाणी कचऱ्यासाठी डबे ठेवण्यात आले आहेत. स्वच्छतेची एवढी काळजी घेतली जात असतानाही काही प्रवाशांनी वस्तू वापरून झाल्यानंतर त्या तशाच बसल्या जागी फेकून दिल्या.

स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक प्रवाशाचे कर्तव्य 

‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’मधील अस्वच्छतेचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली. यावर प्रतिक्रिया देताना रेल्वेतील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, रेल्वे ही सार्वजनिक संपत्ती असल्याने तिथे स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक प्रवाशाचे कर्तव्य आहे. तरीही काही प्रवाशांकडून ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’मध्ये असे कृत्य केले जात असेल तर तिथे तत्काळ स्वच्छतेसाठी ऑन-बोर्ड हाऊसकीपिंग कर्मचारी नेहमी उपलब्ध असतात.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, रेल्वेमध्ये अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्यांवर लोकांनी जोरदार टीका केली. भारताला बाह्य शत्रूंची गरज नाही. आपण आपल्याच व्यवस्थांमध्ये तोडफोड करण्यास आणि त्या नष्ट करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Railway officials' fears realized: Passengers litter Sleeper Vande Bharat train.

Web Summary : Sleeper Vande Bharat, recently launched, faces littering issues. Officials had foreseen this, urging cleanliness. Passengers left trash despite available bins, sparking online outrage. Cleanliness is everyone's responsibility.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वेpassengerप्रवासीSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स