video: 'भोली सी सूरत, आंखों में मस्ती…', WWE स्टार जॉन सीनाने गायले शाहरुख खानचे गाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 04:32 PM2024-02-18T16:32:44+5:302024-02-18T16:34:06+5:30

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Shahrukh Khan John Cena: WWE star John Cena sings Shah Rukh Khan's song | video: 'भोली सी सूरत, आंखों में मस्ती…', WWE स्टार जॉन सीनाने गायले शाहरुख खानचे गाणे

video: 'भोली सी सूरत, आंखों में मस्ती…', WWE स्टार जॉन सीनाने गायले शाहरुख खानचे गाणे

Shahrukh Khan John Cena:बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानचे जगभरात असंख्य चाहते आहेत. फक्त भारतीयच नाही, तर परदेशातील लोकंही शाहरुखच्या चित्रपटांची गाणी ऐकतात अन् गातातही. आता शाहरुखच्या फॅन फॉलोइंगमध्ये WWE सुपरस्टार आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीनाचे नाव जोडले गेले आहे. जॉन सीनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, याते तो शाहरुखचे 'भोली सी सूरत आँखों में मस्ती'  गाणे गाताना दिसत आहे. 

शाहरुख खानचा हिट चित्रपट 'दिल तो पागल है' आणि या चित्रपटाचे गाणे आजही लोकांच्या ओठावर आहेत. आता हेच गाणे जॉन सीनाच्या ओठी आले आहे. जॉन सीनाचा हा व्हिडिओ बॉलिवूड बॉईजने शेअर केला आहे. यामध्ये गुरव सिहरा शाहरुख खानचे 'भोली सी सूरत' हे गाणे जॉन सीनाला शिकवताना दिसतोय. जॉन सीनादेखील हे गाणे अचूनकपणे गाताना दिसतोय. 

व्हिडिओच्या कमेंटमध्ये नेटीझन्स शाहरुख खान आणि जॉन सीनावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

 

Web Title: Shahrukh Khan John Cena: WWE star John Cena sings Shah Rukh Khan's song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.