यूट्यूबरला रोबोट डॉगसोबत मस्ती करणं महागात पडलं; भुंकायला सांगिलं, तर कुत्रा आग ओकायला लागला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 18:36 IST2024-09-03T18:30:31+5:302024-09-03T18:36:07+5:30
हा व्हडिओ एका अमेरिकन इंफ्लूएन्सर आणि ऑनलाइन स्ट्रीमरने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

यूट्यूबरला रोबोट डॉगसोबत मस्ती करणं महागात पडलं; भुंकायला सांगिलं, तर कुत्रा आग ओकायला लागला अन्...
तोंडातून आग ओकणाऱ्या एका रोबोट डॉगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हडिओ एका अमेरिकन इंफ्लूएन्सर आणि ऑनलाइन स्ट्रीमरने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर साधारणपणे 14 तासांत जवळपास 4 कोटी 88 लाख लोकांनी बघितला आहे. तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर हा व्हिडिओ आतापर्यंत 1 कोटीहून अधिक लोकांनी बघितला आहे.
खरे तर, IShowSpeed आपल्या एका Reel मध्ये जवळपास 84 लाख रुपयांना खरेदी केलेला एक रोबोट कुत्रा दाखवत असताना एक कमांड देतो आणि तो कुत्रा अचानक आग ओकायला सुरुवात करतो. यानंतर त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इंफ्ल्यूएन्सरला समोर दिसत असलेल्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारावी लागते. या व्हिडिओवर युजर जबरदस्त कमेंट करत आहेत आणि हा व्हिडिओ शेअरही करत आहेत.
...अन् रोबोट डॉगनं आग ओकायला सुरुवात केली -
व्हिडिओमध्ये, अमेरिकन इंफ्लूएन्सर सर्वप्रथम त्याच्या रोबोट डॉगची ओळख करून देतो. यानंतर तो त्याला भुंकण्यास सांगितो. यानंतर भुंकण्याऐवजी रोबोट डॉग आग ओकायला सुरुवात करतो. सुरवातीला इंफ्लूएन्सर आगीपासून स्वतःचा कसा तरी बचाव करतो. पण दुसऱ्यांदा त्याला आगीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पाण्यात उडी मारावी लागते.
यानंतर रोबोट डॉग पाण्यातही सातत्याने फायर करतो. 34 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये रोबोट डॉग शांत झाल्यानंतर अमेरिकन इंफ्लूएन्सर पुन्हा त्याच्या जवळ येतो आणि आपला डॉग दाखवतो. यानंतरव्हिडिओ संपतो.
इन्स्टाग्रामवर या व्हडिओला आतापर्यंत 40 लाखहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर हजारो कमेंट आल्या आहेत आणि हजारो लोकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे.
Speed’s robot dog shot flames at him wtf 😭
— Speedy Updates (@SpeedUpdates1) September 2, 2024
pic.twitter.com/px4HFI8fzc
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर बघितला जात आहे.