Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:50 IST2025-11-10T13:50:24+5:302025-11-10T13:50:51+5:30
नोटा जमा करण्यासाठी लोक रस्त्यावर धावले, काहींनी नोटा हातात घेतल्या तर काहींनी हवेतील नोटा पकडण्यासाठी उड्या मारल्या.

Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील पहासू येथील अलिगड चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. मोठ्या आवाजात डीजे लावून, रस्त्यावर गर्दी जमवली आणि नोटांचा वर्षाव झाला. थारच्या छतावर उभे असलेले काही तरुण नोटांचा पाऊस पाडू लागले तेव्हा लोकांना धक्काच बसला. नोटा जमा करण्यासाठी लोक रस्त्यावर धावले, काहींनी नोटा हातात घेतल्या तर काहींनी हवेतील नोटा पकडण्यासाठी उड्या मारल्या.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, काही लोक काळ्या रंगाच्या थारवर चढले, डीजे लावला आणि त्यानंतर एकाने त्यांच्या खिशातून चलनी नोटांचं एक बंडल बाहेर काढलं आणि ते हवेत उडवलं. नोटा पाऊस पडताच लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांची मोठी झुंब़ड उडाली. पैसे गोळा करण्यासाठी गर्दी केली.
उत्तर प्रदेश: जिला बुलंदशहर के कस्बा पहासू में डीजे की धुन पर थार गाड़ी की छत पर खड़े होकर की गई नोटों की बारिश।
\— ᴋᴀᴘɪʟ ɢᴏᴜʀ (@GaurBulandshahr) November 9, 2025
कस्बा पहासू के अलीगढ़ चौराहे पर पुलिस पिकेट के समीप की गई नोटों की बारिश।
नोटों की बारिश से पैसे लूटने वालों की सड़क पर लगी भीड़, भीड़ के चलते पहासू शिकारपुर रोड पर… pic.twitter.com/HLxMgNGPE2
व्हिडीओ व्हायरल होताच, बुलंदशहर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. तपास सुरू झाला आणि पहासू पोलिस ठाण्याने व्हिडिओचे ठिकाण आणि वाहनाचा शोध लावला. एएसपी आरए डॉ. तेजवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ पहासू शहरातील अलीगड स्क्वेअरचा आहे. लग्नाच्या वरातीदरम्यान काही तरुणांनी थार कारवर चढून नोटा फेकल्या. व्हिडीओ समोर येताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.
पोलीस पथकाने थार कार जप्त केली. कार मालकाला दंड ठोठावला. संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारमधील तरुण उत्साहात होते. त्यांनी नोटा फेकून सर्वांना आश्चर्यचकित केलं. एएसपी डॉ. तेजवीर सिंह यांनी सांगितलं की, सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टींना सक्त मनाई आहे. ते रस्ते सुरक्षा आणि सामाजिक शांततेच्या विरोधात आहे. सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.