"८ कोटी नाही फक्त २ लाख..."; नवरीवर नोटा उधळल्याच्या Video वर वरपक्षाचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:22 IST2026-02-19T11:21:12+5:302026-02-19T11:22:13+5:30
सध्या सोशल मीडियावर एका पंजाबी लग्नाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

"८ कोटी नाही फक्त २ लाख..."; नवरीवर नोटा उधळल्याच्या Video वर वरपक्षाचा मोठा खुलासा
भारतातील काही ठिकाणी लग्नांमध्ये पैसे उडवण्याची मोठी परंपरा आहे, पण कधीकधी लोक यामध्ये मर्यादा ओलांडतात. सध्या सोशल मीडियावर एका पंजाबीलग्नाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वरपक्षाकडून वधूवर नोटांचा पाऊस पाडण्यात आला. अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की, नवरदेवाच्या कुटुंबीयांनी नवरीवर तब्बल ८.५ कोटी रुपये उधळले आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
१४ फेब्रुवारी रोजी हे लग्न पार पडलं. समारंभात रंगीबेरंगी सजावट, ढोल-ताशा, डीजे आणि पारंपारिक नृत्याचा थाट होता. स्टेजवर नवरदेव आणि नवरीवर पाहुण्यांनी आनंदाने नोटा उडवल्या, ज्याचा व्हिडीओ कोणीतरी सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ 'कोट्यवधींची उधळण' असं म्हणत शेअर झाला. मात्र चौकशीअंती हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचं समोर आलं आहे.
8.5 करोड़ नहीं दुल्हन पर उड़ाए गए थे 4 लाख रूपए
— Journalist Deepika singh (@Deepikasingh043) February 18, 2026
पंजाब की एक शादी का वीडियो वायरल हो रहा था जिसमें दावा किया गया कि दुल्हन पर करोड़ों का कैश उड़ाया गया
शादी में DJ वाले ने बताया कि,ये हाई प्रोफाइल शादी थी, दुल्हन ऑस्ट्रेलिया से थी करीब 4 लाख रुपये उड़ाया गया#viralvideopic.twitter.com/Hw3smGv3MG
कार्यक्रमानंतर उडवलेले पैसे गोळा करण्याची जबाबदारी असलेल्या इव्हेंट मॅनेजर आणि डीजेने स्पष्ट केलं की, एकूण रक्कम सुमारे ४ लाख रुपयांच्या आसपास होती, ज्यामध्ये काही डॉलर्सचाही समावेश होता. 'कोट्यवधी' रुपयांची चर्चा ही पूर्णपणे अतिशयोक्ती असल्याचं त्यांनी सांगितले. हा आकडा नक्की कुठून आला, हे त्यांनाही समजलेलं नाही.
नवरदेवाचा भाऊ सिकंदर सिंग यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, त्यांचं कुटुंब ऑस्ट्रेलियात ट्रक व्यवसायाशी संबंधित आहे. लग्नाच्या आनंदाप्रीत्यर्थ सुमारे २ लाख रुपयांच्या आसपास नोटा उडवण्यात आल्या होत्या. सोशल मीडियावर ८.५ कोटी रुपयांचा आकडा सांगणं पूर्णपणे चुकीचं असून यामुळे विनाकारण संभ्रम पसरवला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.