Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:55 IST2025-09-09T14:54:16+5:302025-09-09T14:55:30+5:30
Punjab Flood : सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही हेच या व्हिडीओतून समोर येतं.

Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
पंजाबमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला. पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही हेच या व्हिडीओतून समोर येतं. पूरग्रस्त भागातील एका लहान मुलाने सर्वांचच मन जिंकलं आहे. एका युजरने पंजाबमधील एका मुलाच्या व्हायरल व्हिडिओवर 'पुढच्या पिढीकडून अजूनही आशा आहे' असं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये बचाव कर्मचारी पूरग्रस्तांना पाण्याच्या बाटल्या वाटत आहेत. तेवढ्यात एक चिमुकला पाण्याची बाटली घेण्याच्या बदल्यात त्यांना पैसे देऊ लागतो. हा क्षण पाहून बचाव कर्मचारी देखील भावनिक होतात आणि मुलाला पैसे परत करू लागतात. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मुलाचा हा गोड व्हिडीओ काढला. तसेच सर्वजण चिमुकल्याचं भरभरून कौतुक करत आहेत.
मुलगा पाणी घेतो आणि वर उभ्या असलेल्या बचाव कर्मचाऱ्याला त्याबदल्यात पैसे म्हणून एक नाणं देतो. जे बचाव कर्मचारी घेण्यास नकार देतात, परंतु तरीही मुलगा त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न करतो. परंतु बचाव कर्मचारी त्याच्या डोक्याला प्रेमाने हात लावतात आणि त्याला पैसे परत करतात. त्यानंतर तो मुलगा तिथून निघून जातो आणि सुमारे २४ सेकंदांची ही क्लिप आता व्हायरल होत आहे.
पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
@thelogicalindian ने इन्स्टाग्रामवर ही रील पोस्ट केली आणि म्हटलं की, जेव्हा मुलाने पाण्याच्या बाटलीच्या बदल्यात पैसे देण्याचा प्रयत्न केला तेव्हा पूरग्रस्त भागातील लोकं भावुक झाली, ज्यामुळे संकटात अनेकदा गमावलेली निरागसता आणि प्रतिष्ठा अधोरेखित झाली. परिसरात भेट देणाऱ्या बचाव कर्मचारी त्याच्या या कृतीने खूप प्रभावित झाले. या व्हि़डीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.