कुणाचं काय, तर कुणाचं काय? पुण्यातील तरूणाचा हटके हेल्मेट; व्हिडीओ पाहून नेटकरी चकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 12:04 IST2023-12-08T12:03:15+5:302023-12-08T12:04:58+5:30

पुण्यातील रस्त्यांवर कार्टूनचे हेल्मेट घालणारा तरूण चर्चेचा विषय ठरलाय. या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. 

Pune bike rider youngster man wearing cartoon new helmet trend video viral on social media | कुणाचं काय, तर कुणाचं काय? पुण्यातील तरूणाचा हटके हेल्मेट; व्हिडीओ पाहून नेटकरी चकित

कुणाचं काय, तर कुणाचं काय? पुण्यातील तरूणाचा हटके हेल्मेट; व्हिडीओ पाहून नेटकरी चकित

Viral Video: तंत्रज्ञानाच्या युगात सध्या सोशल मीडियाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगाच्या पाठीवर कुठे काय घडते आहे, याची माहिती घरबसल्या देणाऱ्या या माध्यमाने प्रत्येकाचे जीवन व्यापून टाकले आहे. त्यातच सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ किंवा पोस्ट शेअर केल्यास ती क्षणार्धात व्हायरल होते. अशाच एका व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात कधी काय घडेल याचा नेम नाही. अशाच प्रकारचा पुणेकरांच्या कल्पकतेचा एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक दुचाकीस्वार तरूणाने घातलेल्या हेल्मेटची सर्वत्र चर्चा होत आहे. व्हिडीओमधील तरूणाने चक्क सशाच्या कार्टूनचे हेल्मेट घातले आहे, त्यामुळे नेटकरी अवाक् झाले आहेत. या नव्या हेल्मेट ट्रेंडने सर्वाचे लक्ष वेधले आहे.

रात्रीच्या वेळी पुण्यातील रस्त्यावर हा व्हिडीओ शूट करण्यात आलाय. पण या तरूणाने हुबेहुब सशाच्या चेहऱ्याचा हेल्मेट घातल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पुण्यातील या तरूणाच्या पुणेरी ट्रेंडचे नेटकऱ्यांनी कौतूक केले. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव देखील होत आहे.

येथे पाहा व्हिडीओ :

Web Title: Pune bike rider youngster man wearing cartoon new helmet trend video viral on social media