उडत्या विमानातच काढले कपडे, उघडं-नागडं होतं प्रवाशाचा विचित्र राडा, करावं लागलं इमरजन्सी लँडिंग; बघा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:12 IST2026-02-04T16:11:37+5:302026-02-04T16:12:03+5:30
परिस्थिती एवढी नियंत्रणाबाहेर गेली की वैमानिकाला विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

उडत्या विमानातच काढले कपडे, उघडं-नागडं होतं प्रवाशाचा विचित्र राडा, करावं लागलं इमरजन्सी लँडिंग; बघा VIDEO
उडत्या विमानांमध्ये होणाऱ्या विचित्रपणाच्या घटना सात्याने समोर येत असतात. मात्र आता घडलेल्या एका विचित्र घटनेने, अक्षरशः विमानाचे इमर्जन्सी लँडिग करण्याची वेळ आली. यामुळे विमान प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका आंतरराष्ट्रीय विमानात प्रवाशाने कपडे काढून प्रचंड गोंधळ घातला. या विचित्र घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं प्रकरण काय? -
हे विमान व्हिएतनाममधील न्हा ट्रांग येथून बँकॉकला जात होते. या 'एअरएशिया'च्या आंतरराष्ट्रीय विमानाने उड्डाण केल्यानंतर एका व्यक्तीने अचानक आपले कपडे काढले आणि गोंधळ घालायला सुरुवात केली. सुरुवातील कुणालाच काही कळेणा. मात्र बघता बघता त्या प्रवाशाने अंतर्वस्त्रावरच, उघडे-नागडे होत विमानात इकडून-तिकडे पळापळ सुरू केली. यामुळे प्रवासीही भयभीत झाले होते.
करावे लागले विमानाचे इमर्जन्सी लँडिंग -
हा संपूर्ण प्रकार सुरू असतानाच, विमानातील कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कुणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. उलट तिने कर्मचाऱ्यांशीच हुज्जत घालायला सुरुवात केली. परिस्थिती एवढी नियंत्रणाबाहेर गेली की वैमानिकाला विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
Русский турист на рейсе Нячанг — Бангкок после посадки прыгнул без трапа, повредил ногу и попытался сбежать.
— FAKE OFF (@fakeofforg) January 30, 2026
Не дотерпел - сильно русский дух стремился наружу из тесной оболочки самолета! pic.twitter.com/EgsDP4xzMj
विमान धावपट्टीवर उतरताच संबंधित व्यक्ती बाहेर पळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, अचानक घडलेल्या या प्रकाराने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.