7 सेकंदात शोधायचा आहे या फोटोतील झेब्रा, जिराफांच्या कळपात बसलाय लपून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 15:13 IST2024-01-12T15:08:14+5:302024-01-12T15:13:47+5:30
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांच्या डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात.

7 सेकंदात शोधायचा आहे या फोटोतील झेब्रा, जिराफांच्या कळपात बसलाय लपून...
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज लोकांमध्ये फारच फेमस आहेत. कारण यातून मनोरंजनही होतं आणि सोबतच मेंदुची चांगली कसतरती होते. सोशल मीडियावर असे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. ज्यात लोकांना काही गोष्टी शोधायच्या असतात तर कधी काही चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांच्या डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे फोटोत काय आहे हे लोकांना सहज समजत नाही. त्यात जे असतं ते दिसत नाही. याने तुमच्या मेंदुची कसरत होते आणि तुमचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो.
काय आहे चॅलेंज?
तुमच्यासमोर एक जंगलातील फोटो आहे. ज्यात तुम्हाला बरीच झाडे आणि जिराफांचा एक कळप दिसत आहे. पण यात एक झेब्राही दिसत आहे. जो लपला आहे. आता चॅलेंज हे आहे की, हा झेब्रा शोधण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे.
तुम्हाला अजूनही यातील झेब्रा दिसला नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. फोटोत तीन निळ्या रंगाचे झेब्रा आहेत आणि तो जिराफच्या अगदी जवळ उभा आहे.
आम्हाला आशा आहे की, तुम्हाला यातील झेब्रा दिसला असेल. असं झालं असेल तर तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत. जर दिसला नसेल तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत तुम्हाला याचं उत्तर मिळेल.