10 लाखहून अधिक लोकांनी पाहिलाय धोनीचा 'हा' Video; हाय स्पीड ट्रेनसमोर धावताना दिसला माही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 17:28 IST2022-01-24T17:25:45+5:302022-01-24T17:28:31+5:30

या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंह धोनी ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने धावताना दिसत आहे....

MS Dhoni runs in front of high speed train Unacademy Ad Video Viral | 10 लाखहून अधिक लोकांनी पाहिलाय धोनीचा 'हा' Video; हाय स्पीड ट्रेनसमोर धावताना दिसला माही

10 लाखहून अधिक लोकांनी पाहिलाय धोनीचा 'हा' Video; हाय स्पीड ट्रेनसमोर धावताना दिसला माही

एज्युकेशन कंपनी Unacademy ची एक जाहिरात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या व्हिडिओमध्ये क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी शानदार अॅक्शन परफॉर्म करताना दिसत आहे. @unacademy द्वारे ट्विट केल्यानंतर, काही तासांतच हा व्हिडिओ 1 दशलक्षहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'लक्ष्यावर नजर आणि प्रत्येक अडचणींवर मात करण्याचा संकल्प... हीच गोष्ट एखाद्याला चॅम्पियन बनवते! आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त (International Day of Education), हे लक्षात ठेवा की, कठीण काळात, धडा क्रमांक 7 नक्की लक्षात ठेवा...

या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंह धोनी ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने धावताना दिसत आहे. Unacademy चे फाउंडर Gaurav Munjal यांनी सांगितले की, हा व्हिडिओ तयार करण्यासाठी जवळपास एक वर्ष लागले आहे.

या व्हिडिओवर शेकडो लोकांनी कमेंट्सदेखील केल्या आहेत. अनेकांनी धोनीच्या परफॉर्मन्सची तारीफ केली आहे. या व्हिडओवर फिल्म मेकर BVS Ravi यांनी ट्विट केले की, या स्टोरीत धोनीशिवाय आणखी कोन मॅच करू शकते! याशिवाय या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना @poojagaikwad309 ने लिहिले आहे, अप्रतिम आणि प्रेरणादायी, अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर ट्विटर यूजर्सनी दिल्या आहेत.

Web Title: MS Dhoni runs in front of high speed train Unacademy Ad Video Viral