एका चापटीच्या बदल्यात दोन लाथा, माकडाशी पंगा घेणं याला पडलं चांगलच महागात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 18:46 IST2021-08-12T18:45:18+5:302021-08-12T18:46:14+5:30
एका माकडाचा व्हिडीओ (Monkey video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. यात त्या व्यक्तीची काहीही चूकी नसताना माकडानं त्याला चांगलच हैराण केलंय.

एका चापटीच्या बदल्यात दोन लाथा, माकडाशी पंगा घेणं याला पडलं चांगलच महागात!
माकडं (Monkey) अत्यंत मस्तीखोर असतात.त्यांच्या माकडचेष्टांसमोर माणसांचं काही चालत नाही. काही वेळा तर ती अक्षरशः हैराण करतात. अशाच एका माकडाचा व्हिडीओ (Monkey video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. यात त्या व्यक्तीची काहीही चूकी नसताना माकडानं त्याला चांगलच हैराण केलंय.
माकड एकतर त्या व्यक्तीच्या हातातून खाणं हिसकावून घेतो (Monkey attack). उलट त्या बदल्यात त्याला लाथा (Monkey attack video) मारतो. ज्याचं तो खातो आहे, त्याच्यावरच त्याने हल्ला केला आहे (Monkey attack on man). चोर तर चोर वर शिरजोर, असंच काहीसं या व्हिडीओत दिसून येत आहे.
व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती खाली बसली आहे. त्याच्याजवळ एक माकड आहे. ती व्यक्ती काहीतरी खाते आहे आणि माकड त्या व्यक्तीच्या हातातील खाणं हिसकावून घेतं. त्यानंतर ते आपल्या सायकलवर बसून जायला निघतं.
माकडाने आपलं खाणं काढून घेतल्याने व्यक्तीला राग येतो. तो त्या माकडाला एक चापटी मारतो. आता कुणीतरी आपल्याशी पंगा घेतला आणि त्याला उत्तर देणार नाही ते माकड कसलं. खाणं हिसकावून गुपचूप आपल्या मार्गाने जाणाऱ्या माकडाला चापटी बसताच त्याची सटकते. माकड त्या व्यक्तीला लाथा मारतो. एका चापटीच्या बदल्यात तो दोन लाथा बरसवतो. माकडाशी पंगा घेणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडलेलं दिसतं आहे.
hayatvahsh_official इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. नेटिझन्स या व्हिडिओला बघुन पोट धरुन हसत आहेत.