मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:46 IST2025-08-11T13:42:45+5:302025-08-11T13:46:44+5:30
यात एक तरुण धाडसी स्टंट करताना दिसत आहे. मात्र, मास्टरचे न ऐकल्याने त्याला, अशी शिक्षा मिळाली की, तो पुन्हा कधी अशी चूक करणार नाही.

मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर सातत्याने नव नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेक तरुण-तरुणी आपले धाडस दाखवत जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसतात. आपण 'मौत का कुआ' (मृत्यूची विहीर)चेही अनेक व्हिडिओ बघितले असतील. यात अनेकांना जीवघेणी स्टंटबाजी करताना बघितले असेल. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात एक तरुण धाडसी स्टंट करताना दिसत आहे. मात्र, मास्टरचे न ऐकल्याने त्याला, अशी शिक्षा मिळाली की, तो पुन्हा कधी अशी चूक करणार नाही.
स्टंटच्या नादात पोपट... -
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही स्टंट मास्टर्स 'मोतका कुआ'मध्ये बाईक घेऊन उभे आहेत. तेवढ्यात एक नवखा तरूण त्याची बाईक सुरू करतो आणि मोतका कुआमध्ये चालवायला लागतो, दरम्यान, एक मास्टर सांगतो की "वर चढू नको", मात्र संबंधित तरुण मास्टरच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतो आणि बाइक विहिरीतील लाकडी भिंतीवर चढवतो, मास्टर पुन्हा ओरडतो, 'वर जाऊ नको', मात्र, तेवढ्यात तरुणाचे बाईकवरील कंट्रोल सुटते आणि बाईक घसरून खाली पडते.
बाइक खाली येताच संबंधित तरुणही विहिरीतील लाकडी भिंतीवरून घसरत खाली कोसळतो. हे दृष्य पाहून कुणाच्याही अंगावर शहारा येईल. महत्वाचे म्हणजे, बाइकचा वेग फार अधिक नव्हता म्हणून मोठा अपघात टळला.
लाखो लोकांनी बघितला व्हिडिओ -
हा व्हिडिओ nikkuvlogz._ नावाच्या इंस्टाग्रॅम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी बघितला आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओ लाइकही केला आहे.
याशिवाय अनेक युजर्स विविध प्रकारच्या रिअॅक्शनही देत आहेत.