तडफडणाऱ्या डॉल्फीनला दिले त्याने जीवनदान; व्हिडिओ पाहुन म्हणाल, माणूसकी जिवंत आहे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 19:47 IST2021-10-05T19:47:06+5:302021-10-05T19:47:19+5:30
बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की, बऱ्याच वेळा समुद्रातील मासे अचानक किनाऱ्यावर पोहचतात आणि नंतर पाण्यात जाता येत नाही. बऱ्याचदा, अशा माशांकडे किनाऱ्यावर लोक असतानाही दुर्लक्ष करतात. मात्र एकानं एका मसीहा प्रमाणं एका डॉल्फिनला वाचवलं आहे.

तडफडणाऱ्या डॉल्फीनला दिले त्याने जीवनदान; व्हिडिओ पाहुन म्हणाल, माणूसकी जिवंत आहे!
जगात मानवतेपेक्षा कुठलाही मोठा कोणताही धर्म नाही, असं नेहमी म्हटलं जातं. म्हणून आपल्याकडून मदतीची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येक गरजूला मदत करणं गरजेचं आहे. हा नियम माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही लागू होतो. सध्या असा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतरही समजतं की, मानवता अजूनही जिवंत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ लोकांना खूप आवडत आहे.
बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की, बऱ्याच वेळा समुद्रातील मासे अचानक किनाऱ्यावर पोहचतात आणि नंतर पाण्यात जाता येत नाही. बऱ्याचदा, अशा माशांकडे किनाऱ्यावर लोक असतानाही दुर्लक्ष करतात. मात्र एकानं एका मसीहा प्रमाणं एका डॉल्फिनला वाचवलं आहे.व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस समुद्रकिनारी फिरत आहे, जेव्हा त्याला पाण्याबाहेर तडफडत असलेला डॉल्फिन दिसतो. तेव्हा हा माणूस त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला पुन्हा समुद्रात ढकलतो.
हा इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडत आहे. अनेक युजर्सने या व्हिडिओतील त्या व्यक्तीचे कौतुक करत कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलं आहे की, माणूसकी फक्त अशाच काही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. हा सुंदर व्हिडिओ इस्टाग्रामवर ‘nature27_12’ नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहीपर्यंत याला २२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.