भयानक अजगरांच्या विळख्यात सापडलाय हा माणूस, त्यांच्याशी खेळत होता खेळ अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 12:00 PM2021-09-20T12:00:56+5:302021-09-20T12:42:59+5:30

साप आणि अजगर हे सर्वांवर भारी पडणारे प्राणी पाहिल्यावर आपण त्यांना लांबूनच पाहु पण एका व्यक्ती मात्र त्यांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवतोय. पाहा या घटनेचा थरारक व्हिडिओ...

man playing with snakes shocking video goes viral on internet | भयानक अजगरांच्या विळख्यात सापडलाय हा माणूस, त्यांच्याशी खेळत होता खेळ अन् मग...

भयानक अजगरांच्या विळख्यात सापडलाय हा माणूस, त्यांच्याशी खेळत होता खेळ अन् मग...

Next

साप आणि अजगर म्हटलं की अंगावरच काटा उभा राहतो. एखाद्या मोठ्या प्राण्याला गिळण्याची ताकद अजगरामध्ये असते. तर सापाचा दंशंच मृत्यूचे कारण ठरतो. असे हे सर्वांवर भारी पडणारे प्राणी पाहिल्यावर आपण त्यांना लांबूनच पाहु पण एका व्यक्ती मात्र त्यांना आपल्या अंगा खांद्यावर खेळवतोय. पाहा या घटनेचा थरारक व्हिडिओ...

 

झूकीपर जे ब्रेवर (Zookeeper Jay Brewer) यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, की हे घरी करून पाहू नका, मात्र नेहमीप्रमाणेच तुमच्या सर्वांचे आभार. नेहमी प्राण्यांसोबत मस्ती करत राहा. व्हिडिओमध्ये ते मोठमोठ्या सापांच्या मध्ये बसलेले दिसत आहेत. ब्रेवरनं आपल्या फॉलोअर्सचे आणि व्हिडिओ लाईक करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. व्हिडिओमध्ये हसत हसत ते हे बोलताना दिसतात, की मला नाही माहिती काय सुरू आहे, मात्र मला असं वाटतंय की मी इथे पूर्ण रात्र घालवणार आहे.

हा व्हिडिओ अपलोड केल्यापासून याला १.२ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोक निरनिराळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरनं हे अविश्वसनीय असल्याचं म्हणत ब्रेवर यांचं कौतुक केलं आहे. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. तर एका यूजरनं त्यांना खतरो के खिलाडीमध्ये जाण्याचा सल्लाही दिला आहे.

Web Title: man playing with snakes shocking video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.