Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 17:45 IST2025-10-18T17:40:25+5:302025-10-18T17:45:06+5:30
Man Lifts Stones With Teeth: दाताने दगडं उचलणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
या जगात काही लोक आपल्या अफाट ताकदीने आणि अनोख्या कौशल्यांनी सगळ्यांनाच थक्क करतात. सोशल मीडियावर अशा अनेक क्षणांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या व्हिडिओत एक व्यक्ती आपल्या दातांच्या मदतीने काही असे करून दाखवतो, जे पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये एका भांड्यात दगड ठेवलेली दिसत आहेत. सबंधित तरुण दगडाने भरलेले हे भांड हाताने नव्हे तर चक्क आपल्या दातांनी उचलतो. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला असून कमेंट बॉक्समध्ये गंमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत.
भाई कौन सा दंतमंजन Use करते हो?
— Kapil Singh (@iamkappu) October 17, 2025
😃🤔
क्या आपके दाँत हैं इतने मजबूत ? 👇👇 pic.twitter.com/2gIBcvD2JM
हा व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवर @iamkappu या युजरने शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "भाऊ, तुम्ही कोणती टूथपेस्ट वापरता? तुमचे दात इतके मजबूत आहेत का?" या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून, त्यावर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका युजरने लिहिले आहे की, "मला ही टूथपेस्ट आफ्रिकेतून मागवावी लागेल बहुतेक!" तर दुसऱ्याने म्हटले आहे की, "हे दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन? हा माणूस खतरनाक आहे!" तिसऱ्या व्यक्तीने "कोणाला त्याचा नंबर माहित असेल तर सांगा, मला खरंच जाणून घ्यायचंय की तो कोणती टूथपेस्ट वापरतो!" अशी कमेंट केली आहे.