Viral Video : बेडखाली या व्यक्तीने तयार केला मोठा भुयार, बघून चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 17:32 IST2021-06-25T17:28:33+5:302021-06-25T17:32:15+5:30

या भुयारात व्यक्तीने प्रकाशासाठी चारही बाजूने पिवळे लाइट्सही लावले आहेत. बघून लक्षात येतं की, हा भुयार तयार कऱण्यासाठी खूप वेळ लागला असेल.

Man has made a big tunnel under the bed shocking video goes viral | Viral Video : बेडखाली या व्यक्तीने तयार केला मोठा भुयार, बघून चक्रावून जाल!

Viral Video : बेडखाली या व्यक्तीने तयार केला मोठा भुयार, बघून चक्रावून जाल!

घरात स्टोर रूम किंवा गुप्त खोली असल्याचं अनेकदा पाहिलं असेल. पण कधी तुम्ही पाहिलंय का की, एका घराच्या रूममध्ये मोठा भुयार आहे. आणि याचा दरवाजा बेडखाली आहे. असा एक प्रकार समोर आला आहे. सामान्यपणे बेडखाली लोक वेगवेगळ्या वस्तू ठेवतात, पण एका व्यक्तीने बेडखाली एक मोठा भुयारी मार्ग तयार केलाय, जो बघून तुम्ही चक्रावून जाल.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एका व्यक्तीने बेडखाली भुयार तयार केला. भुयारी मार्ग इतका लांब आणि मोठा आहे की, बघून डोकं चक्रावून जाईल. या बेडखाली काही पायऱ्या आहेत आणि खाली जाण्यासाठी दूरपर्यंत टनल आहे. आत गेल्यावर रूमसारखा मोठा स्पेसही आहे. (हे पण बघा : Viral Video : आंघोळ करत होती तरूणी, तेव्हाच असं काही घडलं की ती जोरात ओरडायला लागली!)

या भुयारात व्यक्तीने प्रकाशासाठी चारही बाजूने पिवळे लाइट्सही लावले आहेत. बघून लक्षात येतं की, हा भुयार तयार कऱण्यासाठी खूप वेळ लागला असेल. कारण टनलच्या खोदकामाचे भींतींवर चिन्ह बनलेले आहेत. आता या व्यक्तीने हा भुयार का तयार केला हे काही समजू शकलेलं नाही. पण जुन्या काळात किल्ल्यांमध्ये चोर रस्ता म्हणून अशा भुयारांचा वापर केला जात होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
 

Web Title: Man has made a big tunnel under the bed shocking video goes viral