Viral Video : आंघोळ करत होती तरूणी, तेव्हाच असं काही घडलं की ती जोरात ओरडायला लागली!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 01:23 PM2021-06-23T13:23:28+5:302021-06-23T13:24:06+5:30

Viral Video : या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक तरूणी गंगा नदीत आंघोळ करत आहे. मागील दृश्य पाहून हा अंदाज लावला जाऊ शकतो की, हा हरिद्वारचा घाट आहे.

Viral Video : Girl was taking bath then she scream loudly watch viral video | Viral Video : आंघोळ करत होती तरूणी, तेव्हाच असं काही घडलं की ती जोरात ओरडायला लागली!

Viral Video : आंघोळ करत होती तरूणी, तेव्हाच असं काही घडलं की ती जोरात ओरडायला लागली!

googlenewsNext

अनेकदा आपण तंद्रीमध्ये एखादं काम करत असतो आणि जेव्हा अचानक काही घडतं तेव्हा आपल्याला धक्का बसतो. जेव्हा आपण आनंदात बुडालेलो असतो तेव्हा मानसिक रूपाने आपल्याला आराम मिळतो. आपली चिंता दूर होते. पण कधी कधी काही गोष्टींचे भास खतरनाक धक्का देऊन जातात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात एका तरूणीसोबत असंच काहीसं झालंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक तरूणी गंगा नदीत आंघोळ करत आहे. मागील दृश्य पाहून हा अंदाज लावला जाऊ शकतो की, हा हरिद्वारचा घाट आहे. इथे आंघोळ करताना तरूणी आनंदात आहे. पण तिला जराही अंदाज नाही की, काही क्षणात तिच्यासोबत काय घडणार आहे. (हे पण वाचा : महिलेच्या ड्रेसवर चढला उंदीर आणि मग...; ५० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ)

तरूणी नदीत आंघोळ करत असताना तिच्या समोर एक सापासारखी वस्तू वाहत येते. अचानक ती वस्तू बघून ती घाबरते. कारण तिला वाटतं ती वस्तू साप आहे. ती इतकी घाबरते की, तेथून पळण्याचा प्रयत्न करे. अशात पुन्हा एकदा तशी एक वस्तू तिच्याजवळ वाहत येते. मग पुन्हा ती ओरडायला लागते. 

दरम्यान व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला तिला सांगितलं की, ती वस्तू साप नाही तर हार आहे. अचानक अशाप्रकारे वाहत्या नदीत काही समोर आलं तर कुणीही घाबरणारच ना! तसंच काहीसं या तरूणीसोबत झालं. आता हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.
 

Web Title: Viral Video : Girl was taking bath then she scream loudly watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.