वाह रे पठ्ठ्या! लॉकडाऊनमुळे गावाची वाट धरली; अन् ३ महिन्यात दीड लाखाची कमाई केली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 08:35 PM2020-09-02T20:35:50+5:302020-09-02T20:42:05+5:30

काहीजण असेही आहेत त्यांनी लॉकडाऊनचा फायदा घेत संधीचं सोनं केलंआहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका होतकरू तरूणाबद्दल सांगणार आहोत. 

lockdown proves opportunity for boy returned from pune to become farmer | वाह रे पठ्ठ्या! लॉकडाऊनमुळे गावाची वाट धरली; अन् ३ महिन्यात दीड लाखाची कमाई केली

वाह रे पठ्ठ्या! लॉकडाऊनमुळे गावाची वाट धरली; अन् ३ महिन्यात दीड लाखाची कमाई केली

Next

कोरोनाच्या माहामारीत लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक गंभीर प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. लॉकडाऊनमुळे सर्वकाही बंद असल्यानं  लोकांची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होती. नोकरी गेल्यानं अनेकांनी आपल्या गावी जाण्याचा मार्ग निवडला. पण गावी पोहोचण्यासाठीही  अनेकांना खूप कसरत करावी लागली. अश्यात काहीजण असेही आहेत त्यांनी लॉकडाऊनचा फायदा घेत संधीचं सोनं केलंआहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका होतकरू तरूणाबद्दल सांगणार आहोत. 

वाशिम जिल्ह्यातील भर जहाँगिर येथील विजय जायभाये या होतकरू तरूणाची गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कृषी शास्त्रात पदवीधर असलेला विजय सध्या पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. पण अचानक कोरोनाची माहामारी आली. वाढता प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं. अशा स्थितीत विजय जायभाये यानं पुण्यात न राहता गावी जाण्याचा मार्ग निवडला. 

गावी गेल्यानंतर त्यांनी शेतीचं काम करण्याचे ठरवलं. आपल्या पाऊण एकर शेतीत अष्टगंध जातीच्या झेंडू फुलांची लागवड केली. तुमचा विश्वास बसणार नाही पण केवळ तीन महिन्यांत या झेंडूपासून विजयला आतापर्यंत तब्बल दीड लाखांचं उत्पन्न मिळालं आहे. थेट शेतातूनच मुंबई आणि पुण्याच्या बाजारपेठेत २०० ते २५० रुपये किलो प्रमाणे ही फुलं विकली गेली आणि जायभाये कुटुंबाला लॉकडाऊनमध्ये वेगळा मार्ग मिळाला. एकिकडे लॉकडाऊनमध्ये  लोक नैराश्यात असाताना विजयनं मात्र या संधीचं सोनं केलं आहे. 

हे पण वाचा-

वाह, मानलं गड्या! .... म्हणून त्यानं इंजिनिअरची नोकरी सोडून चहाची टपरी उघडली

मोठा दिलासा! कोरोनाच्या सगळ्या रुपांवर प्रभावी ठरणारी लस आली; इटलीतील तज्ज्ञांचा दावा

'कोरोनाच्या लसीबाबत खोट्या आशा अपेक्षा दाखवू नका'; आरोग्य तज्ज्ञांचे PM मोदींना पत्र

Web Title: lockdown proves opportunity for boy returned from pune to become farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.