मोठा दिलासा! कोरोनाच्या सगळ्या रुपांवर प्रभावी ठरणारी लस आली; इटलीतील तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 11:41 AM2020-08-31T11:41:44+5:302020-08-31T11:54:38+5:30

CoronaVirus News & latest Updates : इटलीच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसची लस बदलत्या स्वरुपांवर परिणामकारक ठरेल. या लसीबाबत तज्ज्ञ म्हणाले काय म्हणाले याबाबत आम्ही माहिती देणार आहोत.  

CoronaVirus News : Italy vaccine update reithera vaccine update grad cov2 vaccine | मोठा दिलासा! कोरोनाच्या सगळ्या रुपांवर प्रभावी ठरणारी लस आली; इटलीतील तज्ज्ञांचा दावा

मोठा दिलासा! कोरोनाच्या सगळ्या रुपांवर प्रभावी ठरणारी लस आली; इटलीतील तज्ज्ञांचा दावा

Next

कोरोना विषाणूंच्या संक्रमणामुळे आतापर्यंत देशभरातील २ कोटी ४८ लाख लोक संक्रमित झाले आहेत. या जीवघेण्या व्हायरसनं मृत्यू  झालेल्यांची संख्या  ८ लाख ३८ हजारांवर पोहोचली आहे. या व्हायरसचं म्यूटेशन म्हणजेच बदलतं स्वरुप तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय ठरलं आहे. कोरोनाची तयार होणारी लस व्हायरसच्या बदलत्या स्वरुपाशी लढण्यासाठी कितपत प्रभावी ठरणार याबाबत सगळ्यांच्याच मनात साशंकता आहे. दरम्यान इटलीतील तज्ज्ञांनी एक सकारात्मक दावा केला आहे. इटलीच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसची लस बदलत्या स्वरुपांवर परिणामकारक ठरेल.

माध्यामांच्या रिपोर्ट्सनुसार इटलीमध्ये या लसीला रिथेरा नावाच्या बायोटेक कंपनीने विकसित केलं आहे. या लसीचं नाव GRAd-COV2 आहे.  नॅशनल इंस्टिट्यूट फॉर इन्फेक्शियस डिजीजेजचे साइंटिफिक डायरेक्टर लजारो स्पलंजनी ज्युसेपी इपोलिटो यांनी एका मुलाखतीदरम्यान स्पुतनिकला सांगितले की, वैज्ञानिकांनी दिलेल्या पुराव्यांवरून ही लस म्यूटेशन म्हणजेच व्हायरसच्या वाढत्या प्रसारावर आणि बदलत्या स्वरुपांवर प्रभावी ठरू शकते असं सांगितलं जात आहे.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ही लस तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. पुढील सहा महिन्यात ही लस बाजारात येऊ शकते. त्यानंतर ही लस आंतराराष्ट्रीय तज्ज्ञांसमोर ठेवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम दोन महिन्यांनंतर दिसून येतील. 

लजारो स्पलंजनी ज्युसेपी इपोलिटो यांनी सांगितले की, लसीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अशा देशात केलं जाणार आहे. ज्या देशात कोरोना व्हायरसचं संक्रमण वेगानं पसरलेलं आहे. तिन्ही चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या लसीच्या साईडइफेक्ट्सबाबत माहिती मिळवता येऊ शकते. व्हायरल वेक्टर आधारित तयार करण्यात आलेली ही लस २०२१ च्या शेवटापर्यंत येण्याची शक्यता आहे. या लसीला लवकरात लवकर मान्यता मिळू शकते. त्यासाठी सर्व चाचण्या व्यवस्थित पूर्ण होणं गरजेचं आहे. 

 कोरोनाची लस Covishield' 42 दिवसांत मिळू शकते

ब्रिटेनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोना व्हायरसवरील लस जगभरासाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. या लसीची चाचणी शेवटच्या टप्प्यात आहे. express.co.uk मध्ये छापलेल्या एका अहवालानुसार आजपासून केवळ 42 दिवसांत म्हणजेच सहा आठवड्यात कोरोनाची लस तयार होण्याची शक्यता आहे. ब्रिटन सरकारच्या सूत्राने संडे एक्स्प्रेसला सांगितले की, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि इंपेरिअल कॉलेज लंडनचे संशोधक कोरोना लस तयार करण्याच्या एकदम जवळ पोहोचले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना लसीच्या उत्पादन सारख्या तयारीलाही वेग आला आहे.

वैज्ञानिकांचा हिरवा सिग्नल मिळताच ब्रिटनच्या लोकांना कमी वेळात कोरोना लस मिळण्याची सोय केली जात आहे. ब्रिटनमध्ये कोरोना लसीच्या उत्पादन सारख्या तयारीलाही वेग आला आहे. वैज्ञानिकांचा हिरवा सिग्नल मिळताच ब्रिटनच्या लोकांना कमी वेळात कोरोना लस मिळण्याची सोय केली जात आहे. सुत्रांनी सांगितले की, सर्वात चांगल्या स्थितीत म्हणजेच 6 आठवड्यांत कोरोना लसीची चाचणी पूर्ण होऊ शकते. जर असे झाले तर ते गेम चेंजर ठरणार आहे.

हे पण वाचा-

अरे व्वा! हवेतील कोरोनाच्या प्रसाराला रोखता येणार; लसीनंतर रशियानं तयार केलं अनोखं मशिन

हिवाळ्यात कोरोनाचं रौद्र रुप दिसणार; या देशात ८५ हजार मृत्यू होणार, सरकारी रिपोर्टमधून खुलासा

तुम्हीसुद्धा रिकाम्यापोटी दूध पिता का? मग निरोगी राहण्यासाठी 'या' चूका करणं टाळा

Web Title: CoronaVirus News : Italy vaccine update reithera vaccine update grad cov2 vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.