लाईव्ह टीव्हीवर कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन बसली होती अॅंकर, त्याने टेबलवरच केलं असं काही....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 13:39 IST2024-04-13T13:36:46+5:302024-04-13T13:39:08+5:30
ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक अॅंकर आपल्या डेस्कवर बसून एका श्वानाचा लाड करताना दिसत आहे.

लाईव्ह टीव्हीवर कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन बसली होती अॅंकर, त्याने टेबलवरच केलं असं काही....
बोलिवियामध्ये पाळीव प्राण्यांना दत्तक घेण्यासंबंधी एक न्यूज कार्यक्रमात फारच अजब घटना घडली. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही घटना एका लाइव्ह प्रोग्राम दरम्यान घडली. जी बघून प्रेक्षक हैराण झाले.
ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक अॅंकर आपल्या डेस्कवर बसून एका श्वानाचा लाड करताना दिसत आहे. कार्यक्रमात लोकांना ती श्वानांना दत्तक घेण्याचं आवाहन करत आहे. इतक्यात श्वानाचं पिल्लू डेस्कवर पॉटी करतं. अशात अॅंकर घाबरते आणि काहीवेळ दुसरीकडे बघू लागते. तर तिची को-अॅंकर लगेच तिला एक पेपर टॉवेल देते.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यावर लोकांनी खूप कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट केली की, असं करून श्वानाने आपला एरिया मार्क केला आहे. तर दुसऱ्याने लिहिलं की, असं वाटतं शोआधी त्याने काहीतरी जास्त खाल्लं असेल.
काही दिवसांआधीच अशीच एक घटना समोर आली होती. अमेरिकेच्या सियाटलमध्ये जाणाऱ्या एका फ्लाइटच्या गॅलरीमध्ये एका श्वानाने पॉटी केल्याने फ्लाइट डलासकडे डाइवर्ट करण्यात आली.