जंगलाच्या राजाचा सटकला पाय अन् पडला थेट पाण्यात, त्यानंतर जे झाले ते पाहुन बसेल धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 19:11 IST2021-10-03T19:10:53+5:302021-10-03T19:11:02+5:30
नुकताच सोशल मीडियावर एक जुना जुना व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोन सिंह पाण्याच्या खड्ड्याच्या काठावर मोठ्या उत्साहाने चालताना दिसत आहेत. मात्र त्यानंतर जे होते ते पाहुन तुम्हाला धक्काच बसेल...

जंगलाच्या राजाचा सटकला पाय अन् पडला थेट पाण्यात, त्यानंतर जे झाले ते पाहुन बसेल धक्का...
वन्य जगात सिंहाच्या भीतीची कल्पना प्रत्येकाला असेल. खरं तर, सिंहाची गर्जना जंगलाला घाबरवते. त्यामुळे सिंहापासून दूर राहण्यात प्रत्येक प्राणी स्वतःचे हित मानतो. पण कधीकधी सिंह ही आश्चर्यकारक कृत्ये करतात. ज्या कृतीचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. नुकताच सोशल मीडियावर एक जुना जुना व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोन सिंह पाण्याच्या खड्ड्याच्या काठावर मोठ्या उत्साहाने चालताना दिसत आहेत. मात्र त्यानंतर जे होते ते पाहुन तुम्हाला धक्काच बसेल...
What do you mean I fell? I was just going for a swim 😅😂❤️ pic.twitter.com/8ulKR5xtP9
— ❤️ A page to make you smile ❤️ (@hopkinsBRFC21) September 19, 2021
व्हिडिओमध्ये दोन सिंह पाण्याच्या खड्ड्याच्या काठावर मोठ्या उत्साहाने चालताना दिसत आहेत. हा व्हिडिओ @hopkinsBRFC21 या युजरने ट्विटरवर पोस्ट केला आहे. आतापर्यंत अनेकवेळा पाहिला गेला आहे. वास्तविक हा व्हिडिओ एका जर्मन प्राणीसंग्रहालयाचा आहे. जिथे दोन सिंह खड्ड्याच्या काठावर फिरताना दिसले. दोन्ही सिंह मोठ्या आनंदाने चालत असताना एका सिंहाचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्यानंतर जे घडले ते खरोखर पाहण्यासारखे होते. पाण्यात पडताच सिंह पोहत किनाऱ्याच्या दिशेने येतो आणि पाण्याबाहेर येतो.
सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडिओ लोकांना आवडत आहे. या व्हिडिओसह मजेदार कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘तुला काय म्हणायचे आहे की मी पडलो, मी फक्त पोहायला जात होतो.’ लोक व्हिडिओवर खूप मजेदार कमेंट्स देत आहेत. एका युजरने म्हटले आहे , ‘गर्व पडण्याआधी येतो.’ दुसऱ्याने लिहिले, ‘फारच कमी लोकांनी सिंहाला गडगडताना पाहिले असते.’ अनेक लोकांनी हा व्हिडिओ खूप शेअर केला.