शेतकऱ्याचा रॉयल कारभार; 'ऑडी' कारने बाजारात येतो अन् भाजी विकतो, पाहा VIDEO...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 06:42 PM2023-09-29T18:42:12+5:302023-09-29T18:42:57+5:30

या तरुण शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

kerala-farmer-sujith-selling-vegetables-audi-a4-organic-farming | शेतकऱ्याचा रॉयल कारभार; 'ऑडी' कारने बाजारात येतो अन् भाजी विकतो, पाहा VIDEO...

शेतकऱ्याचा रॉयल कारभार; 'ऑडी' कारने बाजारात येतो अन् भाजी विकतो, पाहा VIDEO...

googlenewsNext

शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, पण सध्या याच जगाच्या पोशिंद्यावर दयनीय अवस्था आली आहे. कधी पाऊस पडत नाही, कधी  पिकाला भाव मिळत आहे, तर कधी खतांच्या किमती वाढतात....अशा कठीण परिस्थितीमध्येही शेतकरी जगतो आणि पुढे जातो. तुम्ही अनेकदा शेतकऱ्यांना हातगाडा, ट्रॅक्टर किंवा ऑटोरिक्षात भाजी विकताना पाहिले असेल. पण, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण शेतकरी चक्क ऑडी कारमध्ये भाजी विकताना दिसतोय. 

अनेकजण म्हणतात, शेती सोपी नाही. हे जोखमीचे काम आहे. हवामानापासून इतर अनेक संकट शेतकऱ्यावर ओढावतात. पण तंत्रज्ञानाच्या साथीने आज देशात अनेक शेतकरी मोठी क्रांती घडवून आणत आहेत. प्रगत शेतीच्या जोरावर अनेक शेतकरी आज श्रीमंतही झाले आहेत. विशेष म्हणजे, सुशिक्षित तरुणही मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळत आहेत. केरळमधील या तरुण शेतकऱ्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, केरळमधील या शेतकऱ्याचे नाव सुजीत आहे. केरळमधील हा शेतकरी चक्क त्याच्या ऑडी A4 मध्ये बसून बाजारात येतो आणि शेतातल्या हिरव्यागार भाज्या विकतो. या तरुणाने आधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत शेती पद्धतीचा अवलंब केला आणि आज तो त्यांच्या शेतातून लाखोंची कमाई करत आहे. 

सुजित त्याच्या परिसरात खूप लोकप्रिय आहे. सुजितचे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रोफाइल आहेत. प्रत्येक प्रोफाईलवर तो त्याच्या शेताची, पिकांची आणि त्याच्या कुशल कारागिरांची छायाचित्रे शेअर करतो. इंस्टाग्रामवर सुजीतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आहेत, पण एक खास व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो शेतात पीक उगवताना आणि नंतर ऑडी कारने बाजारात जाऊन विकताना दिसत आहे. 

 

Web Title: kerala-farmer-sujith-selling-vegetables-audi-a4-organic-farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.