माणुसकीला काळीमा! कुत्र्याला गाडीला बांधून २ किमीपर्यंत फरपटत नेलं; अन् मग.....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 12:14 PM2020-12-13T12:14:07+5:302020-12-13T13:41:04+5:30

Trending Video in Marathi : ही घटना पाहून सोशल मीडियावर  संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

Karela man drags dog by car video goes viral police arrested him | माणुसकीला काळीमा! कुत्र्याला गाडीला बांधून २ किमीपर्यंत फरपटत नेलं; अन् मग.....

माणुसकीला काळीमा! कुत्र्याला गाडीला बांधून २ किमीपर्यंत फरपटत नेलं; अन् मग.....

Next

(Images Source: Indiatimes)

पाळीव प्राणी तसंच वन्य प्राण्यांवर झालेल्या अत्याचारांच्या घटना काही नवीन नाहीत. पण जेव्हाही असं होतं. सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जातो. अनेकांच्या घरी पाळीव  प्राणी असतात. नसले तरीही पाळीव प्राण्याबद्दल लळा लागलेला असतो. केरळमधून अशीच धक्कादायक घटना समोर येत आहे. ही घटना पाहून सोशल मीडियावर  संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

केरळच्या एर्नाकुलमधील एका माणसाने आपल्या चार चाकीला कुत्र्याला बांधलं आणि तब्बल २ किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं आहे. तुम्ही पाहू शकता कार चालकाने कुत्र्याला गाडीच्या मागच्या बाजूने बांधलं आहे. सुरूवातीला या मुक्या जनावराला नक्की काय होतंय हेच कळत नाही. त्यानंतर हा कुत्रा पळण्याचा प्रयत्न करतो. पण गाडीचा वेग वाढवला असल्यामुळे या कुत्र्याला धावता येत नाही. गाडीमुळे फरपटला जातो. 

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार कुत्र्यावर असे अत्याचार करणाऱ्या माणसाचं नाव युसूफ आहे. आपल्या कुत्र्यावर नाराज असल्यामुळे या माणसाने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. अखिल नावाच्या माणसानं हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद केला आहे.  इतकंच नाही तर कुत्र्याला काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार असं म्हणत सुनावलं सुद्धा आहे. अरे व्वा! विद्यार्थ्याने मास्कपासून तयार केला तीन पायांचा स्टूल; हा अविष्कार पाहून तुम्हीही कराल कौतुक

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युसूफला पोलिसांनी ताब्यात  घेतलं आहे.  त्यानंतर कोच्चीमधील एका संस्थेकडे या कुत्र्याला सोपावण्यात आलं. एनजीओमधील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या कुत्र्याला खूप जखमा झाल्या असून शरीरावरची चामडी अर्धवट निघालेली होती. खरचटल्याच्या खुणा अनेक ठिकाणी दिसून आल्या होत्या.  एक दुसरा कुत्रा या कुत्र्याला वाचवण्यासाठी कारच्या मागे पळत होता. त्याचं सुद्धा रेस्क्यू करण्यात आलं आहे. युसूफवर कारवाई सुरू असून त्यांचे वाहन चालक लायसन्स रद्द केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अन् आता १० रूपयात लोकांना पोटभर जेवण पुरवतोय 'हा' अन्नदाता

Web Title: Karela man drags dog by car video goes viral police arrested him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.