Memes On Jio GigaFiber: मुकेश अंबानी बोलत होते; तेव्हा एअरटेल, व्होडाफोनवाले काय करत होते माहित्येय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 05:36 PM2019-08-12T17:36:34+5:302019-08-12T17:46:12+5:30

मुकेश अंबानींच्या Jio ने भारतातील अनेक इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनींना मागे टाकलं. अशातच Jio GigaFiber म्हणजे, तरूणांसाठी पर्वणीच ठरली... 

Jio gigafiber launch twitter reactions viral memes on mukesh ambani | Memes On Jio GigaFiber: मुकेश अंबानी बोलत होते; तेव्हा एअरटेल, व्होडाफोनवाले काय करत होते माहित्येय?

Memes On Jio GigaFiber: मुकेश अंबानी बोलत होते; तेव्हा एअरटेल, व्होडाफोनवाले काय करत होते माहित्येय?

Next

सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात माणसाच्या मुलभूत गरजा बदलल्या आहेत. सध्या माणसाच्या मुलभूत गरजांमध्ये अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच इंटरनेटचंही नाव जोडण्यात आलं आहे. प्रत्येकालाच अगदी सेंकदा-सेकंदाला इंटनेटशी कनेक्ट राहायचं असतं. भारतामध्ये इंटरनेट युगाची सुरुवात झाली तेव्हा इंटरनेटचा स्पीड फारसा नव्हता. तसेच इंटरनेटसाठी फार पैसे मोजावे लागत असल्यामुळे अनेकजण इंटरनेट वापरणं टाळत असतं. पण इंटरनेट युगात फार मोठी क्रांती घडवून आणली ती मुकेश अंबानी यांनी. मुकेश अंबानींच्या Jio ने भारतातील अनेक इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपनींना मागे टाकलं. अशातच Jio GigaFiber म्हणजे, तरूणांसाठी पर्वणीच... 

रिलायन्स इंडस्ट्रीज एजीएम 2019 मध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. जिओ लाँच केल्यानंतर रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजविली होती. यातून प्रतिस्पर्धी कंपन्या सावरत नाहीत तोच रिलायन्सने जिओ गिगाफायबरची बंपर लॉटरी फोडली आहे. यामुळे पुन्हा बाजारात खळबळ उडणार आहे. सुरूवातीला 1600 शहरांमध्ये सेवा सुरू करण्यात येणार आहे. जिओ गिगाफायाबरच्या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून सुरु होणार आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. तसेच फायबर अ‍ॅन्युअल वेलकम ऑफरअंतर्गत 4D/4K टीव्ही आणि त्याचसोबत 4K ची मजा लुटण्यासाठी सेट अप बॉक्स मोफत मिळणार आहे. गिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 

मुकेश अंबानी यांनी ऑफर लॉन्च केल्यानंतर सोशल मीडियामध्ये मीम्सनी एकच धुमाकूळ घातला. पाहूयात सोशल मीडियात व्हायरल झालेले काही मीम्स...

 

Web Title: Jio gigafiber launch twitter reactions viral memes on mukesh ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.