Jewellery jugaad : बाबो! लग्नात मिरवण्यासाठी बाईनं केला कहर; सगळं राहिलं बाजूला अन् मास्कवरच दागिन्यांचा बहर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 19:53 IST2021-05-07T19:52:17+5:302021-05-07T19:53:44+5:30
Jewellery jugaad : लग्न, पार्टी किंवा कोणत्याही फंक्शनला कसं जायचं हा लोकांसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.

Jewellery jugaad : बाबो! लग्नात मिरवण्यासाठी बाईनं केला कहर; सगळं राहिलं बाजूला अन् मास्कवरच दागिन्यांचा बहर
कोरोना व्हायरसच्या माहामारीमुळे लोकांना कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. एकिकडे देशात संक्रमितांची संख्या वाढल्यानं भितीचं वातावरण आहे तर दुसरीकडे लोक या माहामारीपासून बचाव होण्यासाठी आपआपल्या घरात बंद आहेत. दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक राज्यांमध्ये लग्न, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रमांना गर्दी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे लग्न, पार्टी किंवा कोणत्याही फंक्शनला कसं जायचं हा लोकांसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विवाहाबाबत राज्यांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, त्यानुसार केवळ ५० पाहुण्यांना लग्नासाठी आमंत्रित केले जाऊ शकते. याशिवाय आजच्या जीवनात आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चेहर्यावर मास्क लावणे. जर आपण मास्क लावला नाही तर आपल्याला दंड भरावा लागू शकतो. दरम्यान, सोशल मीडियावर असा फोटो व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही म्हणाल की काहीही झाले तरी महिला मेक-अप आणि सौंदर्याबाबत तडजोड करीत नाहीत. बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो
#JewelleryJugaad level "Super Ultra Pro Max..." 😅😅😅 pic.twitter.com/2JV0NpX2v3
— Dipanshu Kabra (@ipskabra) May 7, 2021
आयपीएस अधिकारी दिपांशु काबरा यांनी हा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये एक महिलेनं मास्कवर (Mask) दागदागिने घातलेले तुम्ही पाहू शकता. त्या बाईच्या मागे पाहिलं तर असं वाटतं की ती स्त्री लग्नाला आली आहे आणि सर्वांनी मास्क लावून नियमांचे पालन केले आहे. या महिलेनं यात नवीन ट्रेंड शोधून काढला आहे. सुपर अल्ट्रा प्रो मॅक्स' असं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 'चल आता निघ इथून', लस घेताना पोरीची नाटकं पाहून भडकले डॉक्टर; पाहा व्हायरल व्हिडीओ