Video : ‘जानदार सवारी, शानदार सवारी’, धर्मेंद्रही होते फॅन; राजदूतचा ३३ वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 10:46 IST2023-04-03T10:45:10+5:302023-04-03T10:46:28+5:30

एक असा काळ होता जेव्हा राजदूत ही बाईक सर्वांच्या पसंतीची बाईक ठरली होती. बुलेटपेक्षाही जास्त होती या बाईकची क्रेझ.

Janadaar Sawari Shandaar Sawari vetern actor Dharmendra was also a fan 33 years old video of rajdoot bike goes viral youtube social media | Video : ‘जानदार सवारी, शानदार सवारी’, धर्मेंद्रही होते फॅन; राजदूतचा ३३ वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल

Video : ‘जानदार सवारी, शानदार सवारी’, धर्मेंद्रही होते फॅन; राजदूतचा ३३ वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल

प्रत्येक प्रोडक्ट मग तो लहान असो वा मोठा, त्यासाठी चांगली जाहिरात आवश्यकच असते. विक्री वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या अनेकदा सेलिब्रिटींना त्यांच्या उत्पादनांचे ब्रँड ॲम्बेसेडर बनवतात. अलीकडे, दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांच्या काळातील लोकप्रिय मोटरसायकल राजदूतच्या क्लासिक जाहिरातीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ही जुनी जाहिरात YouTube वर अपलोड करण्यात आली आहे. व्हिडीओची सुरुवात धर्मेंद्र लाल आणि केशरी रंगाची राजदूत मोटरसायकल ड्रिफ्ट करण्यापासून होते. मोटरसायकल सेगमेंटमध्ये राजूदतला तोडच नाही, असंही ते यानंतर म्हणताना दिसतात. तर एक व्यक्ती वजनदार सामान घेऊन जातानाही या जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे.

जन्या ब्रँड पैकी एक राजदूत
ही इतकी मजबूत बाईक आहे की जास्त वजनही ती घेऊ शकते असं धर्मेंद्र यात बोलताना दिसत आहेत. याशिवाय या बाईकची खासियत काय आहे हेदेखील ते सांगताना दिसतायत. राजदूत ही देशातील सर्वात जुन्या मोटरसायकल ब्रँडपैकी एक आहे. आजही या बाईकची आठवण अनेक लोकांसोबत आहे. काही वर्षांपूर्वी पूर्णपणे रिस्टोअर करण्यात आलेल्या राजदूत SHL M11 मोटरसायकलचा एक व्हिडीओदेखील युट्यूबवर शेअर करण्यात आला होता.

Web Title: Janadaar Sawari Shandaar Sawari vetern actor Dharmendra was also a fan 33 years old video of rajdoot bike goes viral youtube social media