Viral Video : महिलेचं लहान मुलासोबत अश्लील कृत्य, Video पाहून संतापले आयपीएस अधिकारी....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 14:36 IST2021-05-14T14:35:52+5:302021-05-14T14:36:15+5:30
एका इव्हेंटमद्ये एक महिला एका लहान मुलासोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेला ट्रोल केलं जातंय.

Viral Video : महिलेचं लहान मुलासोबत अश्लील कृत्य, Video पाहून संतापले आयपीएस अधिकारी....
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे विचित्र व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही असे असतात ज्यावर विश्वास बसत नाही. तर काही व्हिडीओ बघून संताप येतो. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात एका इव्हेंटमद्ये एक महिला एका लहान मुलासोबत अश्लील कृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेला ट्रोल केलं जातंय.
इतकंच नाही तर काही लोकांनी तर या विचित्र कृत्यासाठी महिलेविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा (Dipanshu Kabra) यांनीही हा व्हिडिओ (Video) त्यांच्या ट्विटरवर शेअर केलाय. त्यांनीही महिलेच्या या वागणुकीबाबत संताप व्यक्त केलाय. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, 'अशाने लहान मुलं महिलांचा आदर करणं कसं शिकतील?'. (हे पण बघा : Viral Video : नवरदेवाने आपल्याच लग्नात वाजवला बॅंड-बाजा, IPS म्हणाले - 'आत्मनिर्भर नवरदेव')
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, महिला या लहान मुलाच्या ओठांवर किस करते. तो नाही म्हणतो तरी जबरदस्ती ती त्याला किस करते. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत काबरा म्हणाले की, यात केवळ ही महिलाच नाही तर संबंधित मुलाचे पालक आणि या गोष्टीसाठी तिला प्रोत्साहन देणारा प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे. लहान मुलांना हे सगळं शिकवलं गेलं, तर ते महिलांचा आदर करणं कसं शिकतील?'.
Utter nonsense! 😡
— Dipanshu Kabra (@ipskabra) May 13, 2021
इस महिला के साथ बच्चे के अभिभावक, ओछी हरकत के लिए उकसाने वाला हर कोई इस फूहड़ता का बराबर दोषी है.
बच्चों को ये सब सिखाया जाएगा तो वो महिलाओं की इज़्ज़त करना खाक सीखेंगे? https://t.co/B6tJxI09hC
हा व्हिडिओ पुरुषांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या बिजय सिंह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले, हेच प्रकरण जर उलटं असतं आणि हे कृत्य महिलेसोबत घडलं असतं तर...? मात्र असं झालं नाही हे बरं झालं. कुणी या महिलेविरोधात कारवाई करेल का? मला माहिती आहे, तिच्याविरोधात कोणीच आवाज उठवणार नाही. हा वेडेपणा आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.