Viral Video : नवरदेवाने आपल्याच लग्नात वाजवला बॅंड-बाजा, IPS म्हणाले - 'आत्मनिर्भर नवरदेव'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 04:34 PM2021-05-12T16:34:00+5:302021-05-12T16:38:00+5:30

Social Viral : व्हिडीओत बघू शकता की, नवरी-नवरदेव रस्त्यावर उभे आहेत. नवरदेवाच्या गळ्यात ताशा आहे आणि तो वाजवत आहे. त्याच्या मागे नवरी आणि काही महिला उभ्या आहेत.

Groom played the band at his own wedding ips said Aatmanirbhar Dulha | Viral Video : नवरदेवाने आपल्याच लग्नात वाजवला बॅंड-बाजा, IPS म्हणाले - 'आत्मनिर्भर नवरदेव'

Viral Video : नवरदेवाने आपल्याच लग्नात वाजवला बॅंड-बाजा, IPS म्हणाले - 'आत्मनिर्भर नवरदेव'

Next

सोशल मीडियावर एक लग्नाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक लोटपोट होऊन हसत आहेत. कारण यात एक नवरदेव आपल्याच लग्नात बॅंड वाजवताना दिसत आहे. सजून-धजून नवरदेव ज्याप्रमाणे लग्नात बॅंड वाजवत आहे ते बघून लोक थक्क झाले आहेत. इतकंच काय तर त्याच्या मागे उभी असलेली नवरीही त्याला बघत राहिली. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी शेअर केला आणि त्यावर मजेदार प्रतिक्रियाही दिली.

व्हिडीओत बघू शकता की, नवरी-नवरदेव रस्त्यावर उभे आहेत. नवरदेवाच्या गळ्यात ताशा आहे आणि तो वाजवत आहे. त्याच्या मागे नवरी आणि काही महिला उभ्या आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे समजू शकले नसले तरी बॅंडवर सुरू असलेल्या गाण्यावरून हा व्हिडीओ महाराष्ट्रातीलच असल्याचं समजते. कोरोनामुळे कमी लोकांमध्ये लग्न करण्याचं आावाहन करण्यात आलं आहे. यादरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (हे पण वाचा : Viral : लॉकडाऊनमध्ये नवं जोडपं बुलेटवर फिरायला निघालं; पोलिसांनी अडवताच झालं असं काही..., पाहा व्हिडीओ)

आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'आत्मनिर्भर नवरदेव'.

हा व्हिडीओ त्यांनी १२ मे रोजी शेअर केला. व्हिडीओला आतापर्यंत शेकडो व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडलाय. तर लोक नवरदेवाचं कौतुकही करत आहेत. कारण कोरोना काळात त्याने ही चांगली आयडिया काढली. अनेक मजेदार कमेंटही लोक करत आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Groom played the band at his own wedding ips said Aatmanirbhar Dulha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app