बोंबला! एकाच मांडवात पठ्ठ्याने दोन गर्लफ्रेन्डसोबत केलं लग्न, कारण वाचाल तर जागेवरच 'उडाल'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 14:34 IST2019-08-27T14:33:56+5:302019-08-27T14:34:29+5:30
जे लोक लग्न करण्याचा विचार करत आहेत आणि अनेक मुली बघूनही त्यांचं लग्न जुळत नाही, अशांच्या जखमेवर मीठ चोळणारीच ही घटना आहे.

बोंबला! एकाच मांडवात पठ्ठ्याने दोन गर्लफ्रेन्डसोबत केलं लग्न, कारण वाचाल तर जागेवरच 'उडाल'!
जे लोक लग्न करण्याचा विचार करत आहेत आणि अनेक मुली बघूनही लग्न जुळत नसणाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारीच ही घटना आहे. ही घटना आहे इंडोनेशियातील. इथे एका तरूणाने एकाच मंडपात दोन मुलींशी लग्न केलं. असंही सांगितलं जात आहे की, दोन्ही मुली त्याच्या गर्लफ्रेन्ड आहेत. बरं, त्याने दोघींशीही लग्न केलं कारण त्याला दोघींनाही नाराज बघू शकला नसता म्हणून....
Ani Purwani नावाच्या व्यक्ती या लग्नाबाबतची माहिती फेसबुकला शेअर केली आहे. लग्नाचा व्हिडीओ आणि फोटो आतापर्यंत ९ हजारपेक्षा अधिक लोकांनी शेअर केले आहेत.
Vice Indonesia च्या वृत्तानुसार, या तरूणाने दोन्ही मुलींच्या परिवाराकडून हुंडाही घेतला आहे. इंडोनेशियामध्ये मुलीच्या घरचे लोक होणाऱ्या जावयाला हुंडा देण्याची प्रथा आहे. जेव्हा या तरूणाला विचारलं की, त्याने दोन्ही मुलींशी एकत्र का लग्न केलं? तर यावर तो म्हणाला की, तो दोघींपैकी कुणालाच नाराज करू शकत नाही. हे लग्न १७ ऑगस्टला पार पडलं.
दरम्यान, इंडोनेशियामध्ये अशाप्रकारच्या घटना घडणं काही नवीन मानलं जात नाही. इथे कायदेशीररित्या एक व्यक्ती चार महिलांशी लग्न करू शकतो.