नासामध्ये इंटर्नशिप करताहेत भारताच्या या दोघी बहिणी; फोटो पाहताच कंगना फिदा होऊन म्हणाली....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 16:42 IST2021-03-21T16:20:31+5:302021-03-21T16:42:35+5:30
भारतीय मूळ असलेल्या या दोघी बहिणी नासा ग्लेन रिसर्च सेंटरमध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर को-ऑप इंटर्न आहेत. या दोघी न्यूयॉर्कच्या सिटी कॉलेज ऑफ टेक्नोलॉजीमधून अभ्यास करत आहेत.

नासामध्ये इंटर्नशिप करताहेत भारताच्या या दोघी बहिणी; फोटो पाहताच कंगना फिदा होऊन म्हणाली....
अमेरिकेतील अंतराळ संस्था नासामध्ये (NASA) भारतातील या दोन्ही बहिणी इंटर्नशिप करत आहेत. या दोघींचे नाव पूजा आणि प्रतिमा असे आहे. नासामध्ये ह्यूमन पेसफ्लाईट प्रोग्रामच्या प्रमुख कैथी यांनी हे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या दोन्ही इंजिनिअर्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारतीय मुलींच्या यशाबाबत कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. तर दुसरीकडे फोटोमध्ये त्यांच्या मागे असलेल्या चित्रांबाबत प्रश्न उपस्थि केले जात आहेत.
The beautiful world that everyone’s seeking can only be found in the bridges of our consciousness which lead to our perception, the hope and faith that our inner most being reflects through that perception.Basically life is nothing unless you make it a love affair with yourself.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 19, 2021
कोण आहेत पूजा आणि प्रतिमा रॉय
भारतीय मूळ असलेल्या या दोघी बहिणी नासा ग्लेन रिसर्च सेंटरमध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर को-ऑप इंटर्न आहेत. या दोघी न्यूयॉर्कच्या सिटी कॉलेज ऑफ टेक्नोलॉजीमधून अभ्यास करत आहेत. नासानं एका ब्लॉगमध्ये या दोघींनाही काही प्रश्न विचारले होते. त्यावर या दोघी म्हणाल्या होत्या की, ''आमचा देवावूर पूर्ण विश्वास आहे. आपण जे काही करतो त्याकडे देवाचं लक्ष असतं. त्यामुळे आपली स्वप्न पूर्ण होऊ शकतात. ''
देवतांचे फोटो पाहिल्यानंतर काय म्हणताहेत लोक
काहीजणांनी स्त्रीवादी विचारांनी या फोटोला उत्तर दिलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनं या दोघींना विराट हिंदू असं संबोधलं असून ज्याचं मन विज्ञानाकडे वळेल तो हिंदूत्वाकडे आकर्षित होऊन येईल असं तिनं म्हटलं आहे. सोशल मीडिया युजर्सनी या दोन्ही बहिणींना शुभेच्छा दिल्या आहेत. तर या दोघींचा फोटो बोलका असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. नासाच्या खास मिशनमध्ये दोघी बहिणी सहभागी आहेत. बापरे! वेळेच्या २ मिनिटं आधीच ऑफिस सोडलं म्हणून सरकारी कामगाराचा कापला पगार अन्..
पूजा २०२० च्या सुरूवातीला रिसर्च सेंटरमध्ये रिमोटली इंटर्नशिप करत होती. या दोघी अशा मिशनवर काम करत आहेत, जिथे NASA च्या Moon to Mars मिशन आणि त्याच्या अर्टेमिस प्रोग्रामचा समावेश असणार आहे. दर आठवड्याला त्यांच्या मिटिंग्स असतात. आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, बायोमिमिक्रीबद्दल या दोघी जाणून घेत आहेत. Prime minister nude statue : निवडणुकांच्या १ आठवडाआधी चौकात लावला पंतप्रधानांचा न्यूड पुतळा; फोटो व्हायरल होताच.......