"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 19:46 IST2025-08-12T19:46:12+5:302025-08-12T19:46:54+5:30
प्रियकराचे हे शब्द ऐकून तिने त्याचे डोके पकडले आणि भिंतीवर ४-५ वेळा जोरदार आपटले.

"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
जगात विविध प्रकारचे लोक राहतात. जेव्हा दोन जण प्रेमात असतात, त्यांना चूक आणि बरोबर काही कळत नाही. जेव्हा नाते तुटते तेव्हा ते काहीही सोडत नाहीत. प्रेमानंतर झालेल्या ब्रेकअपचे किस्से तुम्ही बरेच ऐकले असतील. परंतु चीनमध्ये घडलेली एक घटना अजब आहे.
चीनमध्ये राहणाऱ्या जोडप्यासोबत जे घडले ते अजब होते. बॉयफ्रेंडने मुलीला सांगितले, माझ्याशी ब्रेकअप करण्याऐवजी मला मारले असते...प्रियकराचं हे बोलणे प्रेयसीने चांगलेच मनावर घेतले आणि त्यानंतर जे घडले ते हैराण करणारे होते. दोघांमध्ये चांगलाच वाद झाला होता. त्या वादात ब्रेकअपची धमकी मुलीने दिली. मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत ताइयुवान येथे भाड्याच्या घरात राहत होती. बॉयफ्रेंडचं इतर मुलींसोबत संबंध आहेत असं गर्लफ्रेंडला संशय होता. मुलाच्या या स्वभावाला कंटाळून मुलीला ब्रेकअप करायचे होते. परंतु प्रत्येकवेळी मुलगा स्वत:ला नुकसान पोहचवून तिची समजूत काढत होता. परंतु यंदा या दोघांमधील भांडण वेगळेच होते.
एकेदिवशी मुलीने भांडणात पुन्हा ब्रेकअपची धमकी दिली तेव्हा प्रियकराने पुन्हा इमोशनल ड्रामा करण्याचा प्रयत्न केला. तो घरातील भिंतीवर डोके आपटू लागला. त्याच्या नाका, तोंडातून रक्त आले. त्यानंतर तो म्हणाला, शोना, तू का मला मारत नाही, ब्रेकअप करण्याऐवजी तूच मार मला...परंतु यावेळी प्रेयसी संतापली होती. प्रियकराचे हे शब्द ऐकून तिने त्याचे डोके पकडले आणि भिंतीवर ४-५ वेळा जोरदार आपटले. प्रियकर तिथेच बेशुद्ध झाला. त्यानंतर प्रेयसीला भीती वाटली तिने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला हॉस्पिटलला नेले परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी प्रेयसीला ११ वर्ष जेलची शिक्षा झाली आहे.