नवरीला बघताच नवरा पडला बेशुद्ध, तेव्हा मित्राने सावरत म्हटले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 21:26 IST2021-08-16T20:01:41+5:302021-08-16T21:26:41+5:30

लग्नात काही नवरदेव तर असे असतात की जणू त्यांनी त्यांच्या गुडघ्यालाच बाशिंग बांधलेलं असतं. सध्या सोशल मीडियावर सध्या लग्नातील असाच एक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video) होत आहे.

groom was stunned after seeing bride, fainted on the floor video goes viral | नवरीला बघताच नवरा पडला बेशुद्ध, तेव्हा मित्राने सावरत म्हटले....

नवरीला बघताच नवरा पडला बेशुद्ध, तेव्हा मित्राने सावरत म्हटले....

सोशल मिडियावर लग्नाच्या व्हिडिओजची रेलचेल पाहायला मिळते. त्यात वर वधुंच्या एंट्रीचे व्हिडिओतर खास लक्षवेधुन घेतात. लग्नात काही नवरदेव तर असे असतात की जणू त्यांनी त्यांच्या गुडघ्यालाच बाशिंग बांधलेलं असतं. सध्या सोशल मीडियावर सध्या लग्नातील असाच एक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video) होत आहे.

व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की लग्नाचा हॉल आहे. वऱ्हाड्यांची वर्दळ आहे. इतक्यात नवरी येते आणि नवरीला पाहताच नवरदेव बेशुद्ध होतो. मागे उभा असलेला त्याचा मित्र लगेचच त्याला पकडतो आणि त्याला समजवतो की, अरे बाबा थोडी वाट बघ. खरंतर हा नवरदेव बेशुद्ध होण्याचं नाटक करत आहे. पण हा व्हिडिओ पाहुन नेटकऱ्यांची याला भरपूर पसंती मिळत आहे.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ लवलीन थापरनं शेअर केला आहे. हा व्हिडिओ 80 हजारहून अधिकांना हा व्हिडिओ लाईक केला आहे. इतकंच नाही तर लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या क्यूट व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत नवरदेवाचं कौतुक केलं आहे.

Web Title: groom was stunned after seeing bride, fainted on the floor video goes viral